

India Oil Trade
sakal
डॉ. अशोक कुडले
तेलाच्या आयातीच्या मुद्द्यावरून भारताला अमेरिकेने घेरले असून, आपल्या देशावर वाढीव आयात शुल्क लावले आहे. तिकडे या व्यापारात आपल्या देशाला फायदा होतोय. अमेरिकेबरोबरच्या व्यापारात आपली निर्यात जास्त आहे, त्यामुळे अमेरिकेचे महत्त्व आपल्या दृष्टीने अधिक आहे. अमेरिकेला न दुखावता आणि रशियाची मैत्री कायम ठेवून आपल्याला तेलाच्या व्यापाराचे राजकारण हाताळायचे असून, त्यात आपली कसोटी लागेल.