

The Global Liveability Index 2026 ranked Copenhagen as the world's most liveable city, while no Indian city featured among the top 100.
Sakal
दिल्ली : जगात राहाण्यासाठी सर्वार्थाने सर्वोत्तम शहर आहे, ते डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगन. त्या खालोखाल पहिल्या दहा क्रमांकात व्हिएन्ना (ऑस्ट्रिया), मेलबर्न (ऑस्ट्रेलिया), सिडने (ऑस्ट्रेलिया), झुरिक (स्वित्झरलँड), जिनिव्हा (स्वित्झरलँड), ओसाका (जपान), अडेलेड (ऑस्ट्रेलिया), व्हँकुव्हर ( कॅनडा) व टोकियो (जपान) असा दहा शहरांचा क्रम लागतो.
वरील क्रमवारीत ऑस्ट्रेलिया, स्वित्झरलँड व जपान या देशांच्या प्रत्येकी दोन शहरांचा समावेश आहे.