social media
sakal
भारतीय प्लॅटफॉर्म कंपन्यांना विश्वासार्हता जपत प्लॅटफॉर्मची सुरुवात करावी लागेल. त्याचप्रमाणे व्यवहारात पारदर्शकता ठेवणे, आशयाच्या व्यवस्थापनात भारतीय संदर्भाचा विचार होणे आणि भेदाभेदाच्या बाबींना दूर ठेवणाऱ्या प्रभावी यंत्रणेच्या मदतीने प्लॅटफॉर्म विस्तारत नेणे या टप्प्यांच्या आधारे पुढे जावे लागेल.