ढिंग टांग : इस्लामाबाद फाइल्स..!

इस्लामाबादेतील पंचतारांकित हॉटेलात इराण-अमेरिका युद्धबंदीच्या वाटाघाटींच्या नावाखाली पेपरवेट, पिस्तूल, टेरिफ आणि टोमण्यांनी रंगलेला ‘अमन’चा तमाशा
इस्लामाबाद फाइल्स: वाटाघाटींच्या टेबलावर पेपरवेटची फेकाफेकी; जेडी व्हान्सची अराघचीवर झडप!

इस्लामाबाद फाइल्स: वाटाघाटींच्या टेबलावर पेपरवेटची फेकाफेकी; जेडी व्हान्सची अराघचीवर झडप!

Sakal

Updated on

टायटलवर जाऊ नये. कुठल्याही गोष्टीला ‘फाइल्स’ जोडले की थोडी सनसनाटी निर्माण आपोआप होते. एपस्टिन, खरात, केरळ, काश्मीर अशा अनेक फायली तयार आहेत. त्या फायलींच्या गठ्ठ्यावर आम्ही इस्लामाबाद फाइल ठेवत आहो.

इस्लामाबादेतील सेरेना नामक पंचतारांकित हाटेलात इराण, अमेरिका आणि यजमान पाकिस्तान यांच्यात युद्धबंदीच्या वाटाघाटी झाल्या. या वाटाघाटींमध्ये पाकचे लष्कर प्रमुख असीम मुनीर मध्यस्थी करत होते. इराणकडून कलिबाफ, अराघची अशा नावाचे काही प्रतिनिधी आले होते, तर अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स आणि अध्यक्ष डोलांडतात्या ट्रम्प यांचे जावई जारीड कुशनर होते. आपल्या सासऱ्याने आपल्याला चांगल्या भावनेने धाडलेले नाही, असा संशय त्यांच्या मनात आहे. त्यामुळे नाखुशीनेच आले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com