

Satirical Report: Marco Rubio’s Hilarious Imaginary Letter to Donald Trump
Sakal
डिअर ऑनरेबल प्रेसिडेण्ट डोनाल्डतात्या यांसी बालके मार्को अंटोनियो रुबियो याचा शतप्रतिशत प्रणाम आणि शि. सा. न. आपल्या आदेशानुसार मी भारतात येऊन पोचलो. पोचल्यावर कार्ड टाकावे, असे तुम्ही बजावले होते. त्यानुसारच हे पत्र लिहीत आहे. इकडील सर्व क्षेम आहे, तथापि, दिल्लीतल्या गर्मीने हैराण झालो आहे. हे पत्रदेखील मी हॉटेलच्या खोलीत केवळ टावेल गुंडाळलेल्या अवस्थेत लिहीत आहे, यात काय ते समजावे.