
गौरी मांजरेकर
प्राचीन भारतात ऋषींनी वेदांची रचना केली म्हणून ऋषींना संस्कृत साहित्याचे जनक मानले जातात. संस्कृत भाषेबद्दल रुची निर्माण व्हावी, तसेच संस्कृत कलाप्रकारांबद्दल जिज्ञासा निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने १९६९ पासून श्रावण पौर्णिमा हा दिवस ‘विश्व संस्कृत दिन’ म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. या वर्षी हा दिवस नऊ ऑगस्ट रोजी असून, या दिवशी ऋषीपर्वही साजरे केले जाते. या दिवसाचे औचित्य साधून भारतातील एकमेव प्राचीन संस्कृत रंगभूमी जपणाऱ्या कलाप्रकारासंबंधी हे विवेचन.