लष्करे तैयबा सलीम खान (मर्म)

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

जम्मू-काश्‍मीर पोलिसांनी पाकिस्तानपुरस्कृत "लष्करे तैयबा' या दहशतवादी संघटनेचे गेल्याच आठवड्यात एक मॉड्यूल उद्‌ध्वस्त करून, उत्तर प्रदेशातील संदीप शर्मा ऊर्फ आदिल यास अटक केली होती. त्यानंतरच्या काही दिवसांतच उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र पोलिसांनी संयुक्‍त कारवाई करून मुंबई विमानतळावर सोमवारी पहाटे सलीम खान उफ अबू अमर उफ आरिफ याच्या मुसक्‍या बांधल्या. सलीम खान हाही उत्तर प्रदेशचाच! संदीप शर्मा ऊर्फ आदिल हा मुझफ्फरनगरचा, तर सलीम खान हा फतेहपूरचा.

जम्मू-काश्‍मीर पोलिसांनी पाकिस्तानपुरस्कृत "लष्करे तैयबा' या दहशतवादी संघटनेचे गेल्याच आठवड्यात एक मॉड्यूल उद्‌ध्वस्त करून, उत्तर प्रदेशातील संदीप शर्मा ऊर्फ आदिल यास अटक केली होती. त्यानंतरच्या काही दिवसांतच उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र पोलिसांनी संयुक्‍त कारवाई करून मुंबई विमानतळावर सोमवारी पहाटे सलीम खान उफ अबू अमर उफ आरिफ याच्या मुसक्‍या बांधल्या. सलीम खान हाही उत्तर प्रदेशचाच! संदीप शर्मा ऊर्फ आदिल हा मुझफ्फरनगरचा, तर सलीम खान हा फतेहपूरचा. पोलिसांच्या जाळ्यात सापडलेल्या या दोन अट्टल गुन्हेगारांमुळे उत्तर प्रदेशातील तरुण किती झपाट्याने लष्करे तैयबाच्या जाळ्यात सापडत आहेत, यावर प्रकाश पडला आहे. 

सलीम खान तैयबाच्या हवाला विंगशी संबंधित असल्याचा संशय असून, 2008 मध्ये रामपूरमध्ये लष्कराच्या एका तळावर झालेल्या हल्ल्यापासून पोलिस त्याच्या शोधात होते. या हल्ल्यात निमलष्करी दलाचे आठ जवान जखमी झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी यापूर्वी मुंबईतून फाहिम अन्सारी आणि सहाउद्दीन अहमदर हा बिहारी, अशा दोघांस ताब्यात घेतले होते. मात्र, सलीम खान हा गेली नऊ वर्षे पोलिसांच्या हातावर तुरी देत होता. अखेर गुप्तचर यंत्रणांच्या खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार सलीम संयुक्‍त अरब अमिरातीहून सोमवारी पहाटे मुंबईत येणार होता. ती खबर पक्‍की निघाली आणि सलीम पोलिसांच्या जाळ्यात सापडला. आता यामुळे रामपूर लष्करी तळावरील हल्ल्यामागील दुवे उकलण्यास मदत होऊ शकते. मात्र, त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे उत्तर प्रदेश आणि बिहारमधील तरुण "लष्करे तैयबा'सारख्या दहशतवादी संघटनेच्या कच्छपी कसे लागतात, यावरही प्रकाश पडू शकतो. 

सलीमच्या आधी जम्मू-काश्‍मीर पोलिसांच्या हाती लागलेल्या संदीप शर्माची कहाणी मात्र या साऱ्यांपेक्षा वेगळी आहे. संदीप हा मूळचा हिंदू; पण तो या तैयबाच्या नादी लागला आणि त्यानंतर त्याने मुस्लिम धर्म स्वीकारला होता. सलीमच्या विरोधात "लूक आऊट' नोटिस जारी करण्यात आली होती. त्याचे प्रमुख कारण म्हणजे उत्तर प्रदेशातील लष्करी तळांची माहिती पाकिस्तानला पुरवणाऱ्या आफताब अलीला हवालामाफत पैसे पुरवण्यात आले होते. या सर्व हालचालींमागील परदेशस्थ दुवा हा सलीमच आहे, असा पोलिसांचा दाट संशय होता. आता हे सारे रहस्य सलीमच्या अटकेमुळे उलगडू शकते. 

Web Title: lashkar e taiba