छोट्या मुलीचा मोठा लढा

‘मायक्रोप्लास्टिक’ प्रदूषण ही गंभीर समस्‍या बनत आहे. केवळ पशुपक्षी, जलचरांमध्ये नव्हे, तर मानवी शरीरातही त्‍याचे अवशेष आढळत आहेत.
Little girl's big fight
Little girl's big fightSakal

पद्मजा जांगडे

ध्वनी, वायू, जलप्रदूषणामुळे होणारे दुष्‍परिणाम सर्व देशांना भोगावे लागत आहेत. त्‍यात आता प्लास्‍टिकमुळे होणाऱ्या प्रदूषणाची भर पडली आहे. याविरोधात आवाज उठवणाऱ्या भारतीय वंशाच्या सातवर्षीय मोक्षा रॉयला ब्रिटनमधील प्रतिष्‍ठेचा ‘पॉइंट्‌स ऑफ लाइट’ पुरस्‍काराने सन्मानित करण्यात आले.

संयुक्त राष्ट्रांमधील शाश्वत विकास ध्येयांतर्गत ‘मायक्रोप्लास्टिक प्रदूषणा’विरोधात जागृती करण्यासाठी तिला हा पुरस्‍कार मिळाला. हवामान बदलास कारणीभूत ठरणारे प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठी तिने १९३ देशांच्या प्रमुखांना पत्रही लिहिले आहे.

त्‍यास अनेक देशांनी सकारात्‍मक प्रतिसाद दिला. त्रिनिदादच्या राष्‍ट्राध्यक्षा पॉला माए विक्स यांनी भविष्‍यात उद्‌भवणाऱ्या समस्‍येविरोधात लढणाऱ्या मलाला युसूफजाई आणि ग्रेटा थनबर्गप्रमाणेच मोक्षालाही पाठिंबा दिला आहे. हवामान बदलास कारणीभूत ठरणाऱ्या प्रदूषणाबाबत तिच्या भूमिकेची ब्रिटन सरकारने प्रशंसा केलीच, शिवाय शैक्षणिक धोरणात यासंदर्भात बदल करण्यासही सुरुवात केली आहे.

Little girl's big fight
Pune Rain : मॉन्सून दाखल होऊन एक महिना उलटला; मात्र अजूनही प्रगती पुस्तक कोरेच, तब्बल १०५ मिलिमीटर पावसाची तूट

‘मायक्रोप्लास्टिक’ प्रदूषण ही गंभीर समस्‍या बनत आहे. केवळ पशुपक्षी, जलचरांमध्ये नव्हे, तर मानवी शरीरातही त्‍याचे अवशेष आढळत आहेत. प्लास्‍टिक कचऱ्याचे विघटन होत नाही, तर सूर्यप्रकाशात दीर्घकाळ राहिल्‍यास ठिसूळ होऊन त्‍याचे तुकडे पडतात. नव्या संशोधनानुसार, ३० वर्षांत महासागरांमध्ये सापडलेल्‍या पाच लाख कोटी टन प्लास्‍टिक कचऱ्यापैकी जवळपास अडीच टक्‍के मायक्रोप्लास्‍टिकचे कण आढळले आहेत.

पाणी, खाद्यपदार्थ तसेच अन्नश्रृंखला आदी सगळ्याच गोष्‍टीत मायक्रोप्लास्‍टिकचे प्रदूषण वाढले आहे. त्‍याचा प्रत्‍यक्ष-अप्रत्‍यक्ष परिणाम हवामान बदलावर होत आहे. मार्च २०२२ मध्ये पहिल्‍यांदा मानवी शरीरात मायक्रोप्लास्‍टिक असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले होते. एका रुग्‍णाच्या रक्‍तात मायक्रोप्लास्‍टिकचे कण आढळल्‍याने खळबळ उडाली होती. मायक्रोप्लास्‍टिक श्‍वासाद्वारे मानवी शरीरात पोहोचते, असे सिद्ध झाले आहे.

एका संशोधनानुसार, एक व्यक्‍ती वर्षभरात ७४ हजार प्लास्‍टिक कण श्‍वसनावाटे ओढत असतो. गेल्‍या काही वर्षांत समाज माध्यमांवर प्लास्‍टिक प्रदूषणाबाबत जनजागृती करण्यात येत असली, तरी तिचे स्‍वरूप नगण्य आहे, किंवा याकडे तितक्या गांभीर्याने पहिले जात नसल्‍याचे दिसते. मायक्रोप्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठी अवघ्‍या सातवर्षीय मोक्षाने उचललेले पाऊल जगभरातील देशांना पर्यावरण संवर्धनाबाबत सजग राहण्यासाठी भानावर आणणारे आहे.

केवळ मोक्षाच नाही तर सामाजिक बांधिलकी जपण्याचे बाळकडू तिला पिढीजात मिळाले आहे. डॉ. रागिणी आणि डॉ. सौरव रॉय यांची ही कन्या. मोक्षाचे आजोबा कॉम्रेड शामचरण घोष राष्‍ट्रपती पुरस्‍कार विजेते आहेत. पेशाने रेडिओ इंजिनीअर असलेले घोष नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे विश्‍वासू होते. त्‍यांनी इंडियन नॅशनल आर्मीचे प्रमुखपदही भूषवले आहे.

Little girl's big fight
Mumbai Police : मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा फोन... दहा दिवसात तिसरी धमकी

प्रदूषण नियंत्रणासाठी मोक्षा रेडिओ, वृत्तपत्रे, आॅनलाईन माध्यमांतून जागृती करत असते. आपल्या अस्तित्वासाठी आपण या ग्रहाची काळजी घेऊ या, असे ती सांगते.प्रदूषणमुक्‍तीबरोबरच भारतातील गरजवंत मुलांच्या शिक्षणासाठी निधी गोळा करण्याची मोहीम मोक्षाने सुरू केली आहे.

शालेय अभ्‍यासक्रमात प्रदूषणमुक्‍ती विषयाचा समावेश करण्याबाबत तिने अनेक देशांतील प्रमुखांना पत्र लिहिले आहे. आपला देश, तिथे राहणाऱ्या माणसांच्या आरोग्‍याची जबाबदारी मूठभर लोकांच्या हातात नसून ती जगात राहणाऱ्या प्रत्‍येकाची आहे, असा महत्त्वाचा मुद्दा तिने पुरस्‍कार स्‍वीकारताना मांडला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com