

Maharashtra local elections
sakal
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या मतदार यादीतील गोंधळाचा मुद्दा विरोधी पक्षांनी उपस्थित केला आहे. त्याबाबत मविआच्या काही नेत्यांनी थेट निवडणूक आयोगाकडे दाद मागितली आहे. दुसरीकडे भाजपच्या मते, मतचोरीच्या बिनबुडाच्या मुद्द्यावरून सरकारी यंत्रणेवर आरोप करणे योग्य नव्हे. संविधानाने मत मांडण्याचा अधिकार दिला आहे, त्याचा गैरवापर केला जाऊ नये, असे मत भाजपने मांडले आहे.