ढिंग टांग : संकटमोचक संकटात…!

‘संकटमोचक’ प्रतिमेचा बोजा वाढला; वरळीतील नारीशक्तीच्या रोषानंतर गिरीशभाऊंची आत्मकथनात्मक चिठ्ठी, पक्षनिष्ठा कायम ठेवत बिरुद नको अशी विनंती
The 'Troubleshooter' in Trouble: Satirical Take on Girish Mahajan’s Worli Incident

The 'Troubleshooter' in Trouble: Satirical Take on Girish Mahajan’s Worli Incident

Sakal

Updated on

आदरणीय श्री नानासाहेब फडणवीसजी, शतप्रतिशत प्रणाम. मी आता ठीक आहे, काळजी नसावी. तुम्ही उगीच काळजी करत राहाल म्हणून लिहीत आहे. अर्थात परवा वरळीला जांबोरी मैदानाकडे जाताना जे घडले त्या धक्क्यातून अजूनही पुरेसा सावरलेलो नाही, पण दैनंदिन कामाला लागलो आहे. मी पक्षाच्या आदेशाबाहेर कधी जात नाही. शिस्तीचा कार्यकर्ता आहे. (मंत्री असलो म्हणून काय झाले?) पक्षाने आणि सरकारने (पक्षी : तुम्ही) आदेश द्यावा, आणि आम्ही पालन करावे, ही आमची रीत आहे. आजवर अनेक मोर्चांना मी तोंड दिले. दरवेळी कुठलाही पेचप्रसंग उभा राहिला की पक्षादेशानुसार त्या पेचप्रसंगाच्या समोर मी उभा राहातो. पेच सुटतो! म्हणून मला संकटमोचक मंत्री असे बिरुद मिळाले. आजवर त्याचे कौतुक वाटत होते, आता ते टोचते आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com