सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या भाजप आणि शिंदे शिवसेनेतच राजकीय वर्चस्वासाठी चढाओढ तीव्र झाली आहे. महाविकास आघाडीतील संघटनात्मक ताकद आपल्याकडे खेचून घेण्याबरोबरच एकमेकांच्या कार्यकर्त्यांसाठीही गळ टाकले जात आहेत. .विधानसभा निवडणुकीआधी कोकणात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी पारंपरिक लढाई होती; मात्र महायुतीच्या एकतर्फी विजयानंतर राजकीय समीकरणे बदलली. रत्नागिरी सिंधुदुर्गात निवडणुकीआधी भाजपने बऱ्यापैकी संघटनात्मक ताकद वाढवली होती; मात्र जागावाटपात शिंदे शिवसेनेने बाजी मारत दोन्ही जिल्ह्यातील आठपैकी तब्बल पाच जागा मिळवल्या.‘राष्ट्रवादी’चा अजित पवार गट, भाजप यांना प्रत्येकी एक तर ''महाविकास''ला ठाकरे शिवसेनेच्या रुपाने गुहागरची अवघी एक विधानसभा जागा मिळाली. आता महाविकास आघाडी संघटनात्मक स्पर्धेत खूप मागे पडली आहे. शिंदे शिवसेना आणि भाजपमधील संघटनावर्चस्वाचा संघर्ष मात्र वाढू लागला आहे..सिंधुदुर्गाचा विचार करता निवडणुकीआधी तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी भाजप वाढवायला सुरूवात केली होती. नारायण राणे यांच्या प्रवेशानंतर जिल्ह्यात भाजप संघटनात्मक पातळीवर पहिल्या क्रमांकावर गेली. असे असले तरी राणेंना मानणारी कार्यकर्त्यांची मोठी फळी संघटनेत होती. यातून राणेंचे समर्थक आणि मूळ भाजप यांच्यात अदृश्य सीमारेषा कायम होती.अर्थात भाजपमधील शिस्तीमुळे निवडणुकांमध्ये पक्षाची एकत्र ताकद दिसली. त्याकाळात भाजपची मुख्य स्पर्धा ठाकरे शिवसेनेशी होती. शिदे शिवसेना मर्यादित होती. विधानसभेच्या लढतीने समीकरणे बदलून गेली. माजी खासदार निलेश राणे कुडाळमधून शिंदे शिवसेनेतून लढले. यामुळे दीपक केसरकरांच्या सावंतवाडी मतदारसंघापुरती असलेली या शिवसेनेची ताकद कुडाळ, मालवणपर्यंत विस्तारली..निकालात केसरकर आणि निलेश राणे यांच्या रुपाने शिवसेनेचे तब्बल दोन आणि नितेश राणेंच्या रुपाने भाजपला एका ठिकाणी विजय मिळाला. अर्थात तेव्हा आणि आताही भाजपची संघटनात्मक ताकद शिवसेनेच्या तुलनेत अधिक आहे. आधी शिंदे शिवसेनेचे जिल्ह्याचे नेतृत्व म्हणून केसरकर यांच्याकडे पाहिले जायचे. मृदू स्वभावामुळे त्यांच्याकडून संघटनावाढीला मर्यादा होत्या.आता डॉ. निलेश यांनी जिल्ह्यात शिवसेनेच्या संघटनावाढीसाठी काम सुरू केले आहे. त्यांच्या आक्रमक शैलीचा प्रभाव दिसू लागला आहे. भाजपचे नेतृत्व खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे आहे. अलिकडे डॉ. निलेश यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेत भाजपमधील काही पदाधिकारी प्रवेशकर्ते झाले. याच्या दुसऱ्याच दिवशी भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्गात येत भाजपची ताकद कायम राखण्याचे आवाहन केले..रत्नागिरीचा विचार करता भाजपला संघटनावाढीचे मोठे आव्हान आहे. निवडणुकीआधी येथे ठाकरे शिवसेनेचा आणि उदय सामंत यांचा प्रभाव होता. निवडणुकीने ठाकरे शिवसेनेला मोठा धक्का दिला. येथील पाचपैकी तीन जागा शिंदे शिवसेनेने आणि एक अजित पवारांच्या ‘राष्ट्रवादी’ने मिळवली.ठाकरे शिवसेनेचे एकमेव आमदार म्हणून भास्कर जाधव निवडून आले. पण त्यांच्या संघटनावाढीच्या फारशा हालचाली नाहीत. जिल्ह्यातील राजापूरपासून चिपळूणपर्यंतच्या भागात संघटना बळकटीची स्पर्धा तीव्र होताना दिसत आहे. भाजपने येथील संपर्कप्रमुखपद नितेश राणेंना दिल्यानंतर ते आक्रमक शैलीने सक्रिय झाले आहेत..अलीकडेच मिरकरवाडा (रत्नागिरी) भागात असलेली अतिक्रमणे हटवत त्यांनी राजकीय प्रस्थापितांना एकप्रकारे शह दिला, असे मानले जाते. या ठिकाणी संभ्रमावस्थेत असलेल्या ठाकरे शिवसेनेच्या संघटनात्मक फळीला आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न शिवसेना आणि भाजप यांच्याकडून सुरू आहेत. शिंदे शिवसेनेतील सामंत बंधू आणि दापोलीकडच्या भागात रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांचा प्रभाव आहे.नितेश राणे आणि खासदार नारायण राणे यांची ताकद भाजपच्या संघटनावाढीसाठी सक्रिय झाली आहे. त्यामुळे अप्रत्यक्षरीत्या येथेही संघटनेसाठी महायुतीतील मित्रपक्षातच चढाओढ सुरू आहे. ढोबळपणे ही चढाओढ शिवसेना-भाजपमध्ये असली तरी याच्या केंद्रस्थानी राणे पिता-पुत्र, सामंत बंधू हे आहेत. सिंधुदुर्गात राणे कुटुंबाकडे पूर्ण राजकीय ताकद आली आहे..एकाच कुटुंबात खासदार आणि दोन आमदार असल्याने प्रशासनावर त्यांची पकड आहे. पालकमंत्रिपद स्वीकारल्यानंतर नितेश राणे यांनी नारायण राणेंच्याच आक्रमक शैलीत कामाला सुरुवात केली आहे. राणेंपेक्षाही पुढचा विचार करणारे नेतृत्व म्हणून त्यांनी ओळख आहे. पूर्ण जिल्ह्यात त्यांनी नेटवर्क तयार केले होते. आता भाजपच्या संघटनावाढीची, जिल्ह्याच्या विकासात्मक बदलाची मुख्य जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे..याचवेळी शिंदे शिवसेनेच्या वाढीचे नेतृत्व डॉ. निलेश राणे यांनी हाती घेतले आहे. त्यांनी स्वतःमध्ये अनेक सकारात्मक बदल केले आहेत. याचा प्रभाव विधानसभेच्या निकालातही दिसला. भाजपच्या संघटनेवर रवींद्र चव्हाण यांचाही प्रभाव असणार आहे. नारायण राणे भाजपचे खासदार असले तरी या सगळ्या राजकीय गणितात महायुतीचे वरिष्ठ नेते अशा भूमिकेतच ते दिसतील, असे वाटते. संघटनावाढीसाठीचे फिल्डवर्क आपापल्या पक्षासाठी त्यांचे दोन्ही पुत्र करताना दिसतात.सिंधुदुर्गात ठाकरे शिवसेनेचे जास्तीत जास्त कार्यकर्त्यांचे बळ आपल्याकडे खेचण्याबरोबरच मित्रपक्षातील वजनदार नेते संघटनेत घेण्यासाठी पुढच्या काळात या दोन्ही पक्षातील चढाओढ तीव्र होणार आहे. रत्नागिरीत चिपळूणपर्यंत सामंत बंधूंनी संघटनात्मक प्रभाव निर्माण केला आहे..दापोली मंडणगड भागात रामदास कदम आणि त्यांचे पुत्र योगेश कदम अशी दिग्गज मंडळी शिंदे शिवसेनेकडे आहेत. सामंत बंधू आणि राणे यांच्यात याआधी राजकीय चढाओढ होती. आता भाजपने संपर्कप्रमुखपद देऊन नितेश राणे यांच्यावर रत्नागिरीचीही जबाबदारी दिली आहे. या भागात नारायण राणे यांना मानणारा मतदारही बऱ्यापैकी आहे. त्यामुळे या जिल्ह्यातही संघटनात्मक चढाओढ सुरू झाली आहे.स्थानिक संस्था ठरवणार वर्चस्वजिल्हा परिषदेत रत्नागिरीत ५५ तर सिंधुदुर्गात ५० गटांसाठी निवडणूक होणार आहे. या दोन्ही जिल्ह्यात मिळून १७ पंचायतसमित्या आहेत. याशिवाय दोन्ही जिल्ह्यांत आठ नगरपालिका आणि तितक्याच नगरपंचायतींसाठी निवडणुका होणार आहेत. फक्त चार नगरपंचायतींमध्ये सध्या लोकनियुक्त कार्यकारणी कार्यरत आहे..महायुती म्हणून लढल्यास जागावाटपाचे समीकरणही चर्चेचा विषय ठरणार आहे. कारण विधानसभेच्या जास्त जागा शिंदे शिवसेनेकडे आहेत. तुलनेत सिंधुदुर्गात भाजपकडे संघटनात्मक बळ अधिक आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुका शिवसेना आणि भाजप यांच्यातील वर्चस्वाचा फैसला करणाऱ्या ठरणार आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.