ढिंग टांग : अखेर तिढा सुटला..!

महायुतीच्या जागावाटपावर गुप्त बैठक; दिल्लीहून ‘ऊर्जा’ घेऊन आलेल्या नेत्यांचा फार्म्युल्यावर गोंधळ, मोदींच्या नावावर तिढा सुटल्याचा दावा
Political Satirical Slabs: Decoding the Secret Confabulations of the Grand Alliance Trio

Political Satirical Slabs: Decoding the Secret Confabulations of the Grand Alliance Trio

Sakal

Updated on

स्थळ : अज्ञात. वेळ : अज्ञात. पात्रे : नेहमीची तीन.

बैठक चालू आहे. खुर्च्या तीनच. तिन्ही खुर्च्यांवरील महायुतीचे नेते गप्प बसून आहेत. एक (नंबर) नेता उगीचच फायली वरखाली करून सह्या कुणी कुणी केल्या आहेत, ते तपासून बघतो आहे. दोन नंबरचा नेता पेपरमिंटची गोळी चघळत इकडे तिकडे बघतो आहे. तिसऱ्या क्रमांकाचे नेतृत्व ‘हाताची घडी, तोंडावर बोट’ या आविर्भावात गप्प बसून आहे. अब आगे...

नानासाहेब : (फायलीतून डोकं वर न काढता) कधी आलात?

भाईसाहेब : (पेपरपिंट एका गालातून दुसऱ्या गालात) कध्धीच..! पण मी वैनीसाहेबांच्या आधी आलो!! सर्वांत आधी मीच येणार होतो, पण तुम्ही आधीच येऊन बसला होता...

वैनीसाहेब : (मान वर करून हो ना!

नानासाहेब : (अपराधी सुरात) त्याला काही इलाज नाही! हे माझंच घर आहे!

भाईसाहेब : (माहिती काढल्याप्रमाणे) दिल्लीला जाऊन आलात की!

नानासाहेब : (भक्तिभावाने हवेत हात जोडत) नमो नमः नमो नः!! वंदनीय मोदीजींचं दर्शन घेतलं की कसं बरंऽऽ वाटतं! मी त्यांच्याकडे जाऊन नेहमी भरपूर ऊर्जा घेऊन येतो!!

वैनीसाहेब : (रितीभातीनुसार हात जोडत) हो ना!!

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com