ऑलिंपिकसाठी घडताना... : यशाचा पाया निरंतर प्रशिक्षण

ऑलिम्पिकमध्ये सहभागाचे स्वप्न पाहणाऱ्यांना बालपणापासूनच मेहनत करावी लागते. त्यामुळे खेळाडूंबरोबर पालकांची भूमिका, दृष्टिकोन, कष्ट घ्यायची तयारी या बाबींना महत्त्व आहे.
Training
TrainingSakal

दर्जेदार प्रशिक्षकाकडून खेळातील बारकावे, डावपेच शिकणे, स्पर्धांमध्ये सहभाग घेणे, अन्य खेळाडूंबरोबर खेळणे यातूनच खेळाडू घडत असतो.

ऑलिम्पिकमध्ये सहभागाचे स्वप्न पाहणाऱ्यांना बालपणापासूनच मेहनत करावी लागते. त्यामुळे खेळाडूंबरोबर पालकांची भूमिका, दृष्टिकोन, कष्ट घ्यायची तयारी या बाबींना महत्त्व आहे. विशेषतः जिमनॅस्टिकसारखे लोकप्रिय आणि शारीरिक मेहनतीचे खेळ असतात, त्यासाठी खेळाडू वयाच्या चौथ्या किंवा पाचव्या वर्षांपासून सुरूवात करतात. शरीराला विशिष्ट प्रकारची सवय होण्यासाठी खूप लहान वयातच सुरुवात करावी लागते. त्याकरता त्यांना आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना जीवनशैलीमध्ये अनेक बदल करावे लागतात. त्याशिवाय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे स्वप्नदेखील बघता येत नाही. सरावासाठी मैदानावर जास्त वेळ द्यायचा असतो. अभ्यासाला, कौटुंबिक कार्यक्रमांना मुकावे लागते. अनेक विद्यार्थी होम स्कूलिंग करतात. अशा खेळाडूंना चांगल्या प्रकारच्या प्रशिक्षण, प्रवास आणि अनेक अनपेक्षित गोष्टींसाठी पैसे लागतात.

उत्तम प्रशिक्षक मिळाला तरी खेळाच्या सरावासाठीची उपकरणे, जागा यांचीदेखील गरज असते. या साहित्यामुळे खेळाडूला विशिष्ट व्यायाम आणि काही आवश्यक कौशल्ये आत्मसात करता येतात. परिपूर्ण प्रशिक्षणासाठी या सगळ्या गोष्टी अत्यावश्यक आहेत. वैयक्तिक क्रीडाप्रकारात सहभागासाठी काय पात्रता असावी, त्याबरहुकूम त्याची करणे याचेही ज्ञान खेळाडूला असावे लागते. अशी पात्रता कसोटी खेळाडूला जितक्या लवकर कळेल, तितक्या लवकर शारीरिक, मानसिक आणि सर्व कौशल्यासहित तो स्पर्धेत उतरू शकतो. त्यासाठी वेळापत्रक करून प्रशिक्षण सुरू ठेवू शकतो.

प्रशिक्षण आणि स्पर्धा

प्रशिक्षकांकडून उत्तम प्रशिक्षण मिळत असते. शरीराला थकवणाऱ्या आणि सहनशक्ती वाढवणाऱ्या व्यायामातून जाण्याची गरज असते. त्यासाठी दिवस-रात्र खेळाडू मेहनत करतात. आठवड्यातील सहा दिवस प्रशिक्षण हे खेळाच्या पूर्वतयारीसाठी वैयक्तिक पातळीवर गरजेचे असते. आवश्यक असते. यासाठी खेळाची जी गरज असेल, त्याप्रमाणे खेळाडू स्वतःला सज्ज करतात. कठोर मेहनतीचे पद्धतशीर प्रशिक्षण आणि त्याबरोबरच शरीराला योग्य विश्रांती देऊन परत मेहनतीसाठी सज्ज करणे गरजेचे असते. हे चक्र सुरू ठेवणे आवश्‍यक असते. प्रशिक्षणातील विविधता सातत्य व उत्साह टिकवावा लागतो. प्रशिक्षण हे नवनवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सज्ज करते. ते प्रत्येक खेळासाठी वेगवेगळे असते. त्यामुळेच खेळाडूला स्पर्धेच्या वातावरणाची सवय होते. त्याच्याशी जुळवून घ्यायला मदत होते. त्याची मानसिक सज्जताही त्यातून होते. उदाहरणार्थ- खेळाचा सराव हा त्या-त्या खेळाच्या स्पर्धेच्या वेळेनुसार करतात, ज्या योगे स्पर्धेच्या ठिकाणी आणि त्यावेळच्या परिस्थितीनुरूप खेळण्याचा सराव होतो. खेळाडू त्यांच्या विशिष्ट खेळाच्या प्रत्येक पैलूचा सराव आठवड्यातून एकदा तरी करतात. काही क्रीडा प्रकारामध्ये जसे की, पोहणे या क्रीडा प्रकारासाठी खेळाडूला अनेक कौशल्ये आत्मसात करावी लागतात. कारण त्यांच्या एकाच क्रीडा प्रकारात त्याला अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धांना सामोरे जावे लागते. खेळाडूंनी प्रत्येक क्रीडा प्रकाराचा सातत्याने सराव केला पाहिजे, ज्यामुळे आत्मविश्वास मिळतो आणि वाढतो. त्याच्या खेळात सातत्य राहते.

परस्परांकडून शिकणे

बरोबरीच्या खेळाडूंबरोबरचा सराव फायद्याचा असतो. कारण ध्येय सामाईक असते आणि त्यामुळे कामगिरी उंचावत जाते. अनेकदा खेळाडू इतर खेळाडूंकडून शिकत असतात. कमजोरींवर मात करू शकतात. जेव्हा खेळाडू पात्रता फेरीमध्ये काहीशा तणावाच्या परिस्थितीत अनोळखी आणि जगभरातल्या खेळाडूंबरोबर व प्रेक्षकांसमोर कामगिरी सादर करतात, तेव्हा त्याचा त्यांना प्रत्यक्ष पर्धेच्यावेळी फायदा होतो.

काय करतो दर्जेदार प्रशिक्षक?

  • खेळाडूस बनवतो परिपूर्ण.

  • शिकवतो खेळातील बारकावे .

  • तरबेज करतो स्पर्धात्मक डावपेचात .

  • ज्ञान देतो स्पर्धेचे नियम, अटींबाबत.

  • रुजवतो स्पर्धात्मक दृष्टिकोन.

  • मानसिक तयारीने देतो बळ.

  • खेळाडूत निर्माण करतो जिद्द, चिकाटी.

- महेंद्र गोखले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com