हौस ऑफ बांबू :  मान, पान आणि…कान!

कान फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर नऊवारी साडी, नथ आणि मराठमोळ्या थाटात प्राजक्ता माळीची झळाळी; ‘अभिजात मराठी’ ओटीटीच्या जागतिक लाँचिंगमुळे मराठीचा मान जगभर दुमदुमला
Marathi Glamour at Cannes: Traditional Attire Takes Center Stage

Marathi Glamour at Cannes: Traditional Attire Takes Center Stage

Sakal

Updated on

कु. सरोज चंदनवाले

नअस्कार! एरवी मी नऊवारी साडी नेसणं सोडलंय. कोथरुडच्या (पुणे समाविष्ट) चहाटळ लोकांच्या नजरा टाळण्यापेक्षा न नेसणं पर्वडलं…म्हंजे नऊवारी साडी न नेसणं पर्वडलं!! मागल्या खेपेला मी अशीच एका कार्यक्रमासाठीaजाताना सहज म्हणून नऊवारी साडी नेसल्ये, तर रस्त्यात थांबवून मला ‘काय बाई, कुटं हाय पोग्राम?’ असं इच्यारलं. नतद्रष्ट मेले! सणासुदीला मात्र मी नऊवारी साडी नेसत्ये. नऊवारी आणि नथ हे माझं स्टाइल स्टेटमेंट आहे. नऊवारी साडी नेसून बाप्पाच्या मिरवणुकीत ढोल बडवताना माझा फोटो खूप गाजला होता. रसिकांनी तो बघितलाच असेलच.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com