निसर्गाचा अनोखा रंगोत्सव...

बसस्टॉपवर बराच वेळ बसची वाट बघून कंटाळलो होतो. इतक्यात लाल रंगाची ती `परी’ दुरून येतांना मला दिसली.
msrtc st bus stop Nature unique bird
msrtc st bus stop Nature unique bird esakal
Updated on
Summary

बसस्टॉपवर बराच वेळ बसची वाट बघून कंटाळलो होतो. इतक्यात लाल रंगाची ती `परी’ दुरून येतांना मला दिसली.

बसस्टॉपवर बराच वेळ बसची वाट बघून कंटाळलो होतो. इतक्यात लाल रंगाची ती `परी’ दुरून येतांना मला दिसली. झाडाच्या सावलीखाली थांबलेली मंडळी पुढे आली. धूळ उडवीत बस सुरु झाली.

खिडकीतून दूरवर फुललेले गुलमोहर, पळस भगव्या रंगाने सगळ्यांचे लक्ष वेधत होता. पिवळ्या फुलांनी लगडलेला सोनबहावा नजरेत भरत होता. एसटीने घरघर करत घाट चढत असल्याची जाणीव करून दिली आणि माझी नजर दरीत दिसणाऱ्या गुलाबी थव्यांवर स्थिरावली.

msrtc st bus stop Nature unique bird
PMPML Bus : पीएमपी बसमधून महिलेचे दागिने लंपास

एखाद्या झाडावर पक्ष्यांचे थवे विसावलेले असावेत, असा भास होत होता. त्या निष्पर्ण काटेरी वृक्षाला गुलाबी रंगाचे पेले लटकले होते. तो सगळा परिसर गुलालाची उधळण करीत असल्याप्रमाणे वाटत होते.

दाही दिशांना पाहणारी पेल्याच्या आकाराची गुलाबी फुले मोहून टाकत होती. दूरवरची काटेसावर नजर खिळवून ठेवत होती. एरवीचा काटेरीपणा गुलाबी शाल पांघरून तिने लपवला होता. काट्यांचीच फुले झाली असावीत.

msrtc st bus stop Nature unique bird
Life skill tips: लेकरांना आलंच पाहिजे हे खास लाईफ स्किल, लहानपणीच शिकवा होईल फायदा

मूळचा राकटपणा सोडून ती सौंदर्यवती झाली होती. घाटातले मोठे वळण आले. उजवीकडून वरून वाहत येणारा पावसाळी धबधबा आता रोडावला होता. एक नाजुकशी धार मात्र अखंड धावत होती. अगदी निरागस आठवणींसारखी. झाडांच्या सावल्या सळसळत होत्या. उन्हाळा आत खोलवर शिरू देत नव्हत्या.

सोनबहाव्याच्या पिवळ्या सोनेरी रंगावर रेंगाळणारी नाजूक फुलपाखरे बघून एक मात्र नक्की झालं, की फुलपाखरे अजूनही फुलांच्या प्रेमात पडतात. सोनेरी पिवळा म्हणजे काय हे फक्त सोनबहाव्याकडे पाहून कळते. ही तर पावसाची वर्दी!

msrtc st bus stop Nature unique bird
Maharshtra Budget : आपलं अर्थसंकल्पीय बजेट नक्की कोण मंजुर करतं?

खरं तर फुलांना बघून पाऊसच लवकर त्यांना भेटायला येत असावा, असं मला नेहमी वाटतं. गुलमोहर कधी लालबुंद फेटा उडवत असतो, तर कधी तांबड्या रंगाच्या वेगवेगळ्या छटांची उधळण करत असतो. पण आता मात्र माझी नजर हिरव्या वनराईचा भाग बनून फुलणाऱ्या, हिरव्या पुष्पसृष्टीवर स्थिरावली.

साग, बोरी, बाभळी, जांभूळ या लहान मोठ्या वनराईवरचा फुलोरा आपल्याला जणू साद घालतो आहे, असं वाटून गेले. चांदण्याच्या आकाराची असंख्य फुले एकत्रपणे झुपक्यांनी झोके घेत होती. नोकरीला लागायच्या अगोदर म्हणजे चाळीस- पंचेचाळीस वर्षापूर्वी सगळ्या फुलांशी माझी मैत्री होती.

msrtc st bus stop Nature unique bird
Maharashtra Budget 2023 : महिलांसाठी बजेटमध्ये मोठी घोषणा! आता एसटी बसमध्ये महिलांना सरसकट...

त्या मैत्रीला स्मरून माझं मन फुलपाखरू बनून पानाफुलांना स्पर्शत होतं. श्वासात त्यांचा सुगंध मी भरून घेत होतो. निसर्गसृष्टीचा रंगोत्सव आणि त्यांच्या संवेदना टिपून घेत होतो.इतक्यात मी सुरंगीच्या झाडाजवळ येऊन पोहचलो. माझा शालेय जिवातील मीटरच जणू.

सुरंगी ही एकमेव फुले जी झाडांच्या खोडातून जन्म घेतात. खोडाच्या सालींच्या भेगांमधून पांढऱ्या शुभ्र काळ्या बाहेर डोकावू लागतात. काही दिवसांतच पिवळे केसर गच्च भरलेल्या मोत्यांसारख्या कळ्या उमलू लागतात.

पाकळ्या उमलून आतला ओळ केसर परिसर सुगंधित करतो. फक्त तीन दिवस हे वृक्ष सोन्यामोत्यांच्या साज घेऊन निसर्गाच्या रंगोत्सवात सामील होतात. अगदी बेधुंद होऊन रंगांची उधळण करीत असतात. तशीच बकुळही तिच्या मनात घर करून असलेली. ही फुले पानापानांतून डोकावणारी, खाली पडल्याशिवाय हाती न लागणारी. एवढ्या मोठ्या वृक्षाची छोटी छोटी फुले. सुगंध धुंद करणारा.

आता मात्र बसचा खडखडाट ऐकू येत नव्हता. मी एका अद्भूत दुनियेची सफर करून आलो होतो. एरवी कुठे पैसे खर्चूनही न सापडणारी दुनिया मला तिथे सहजपणे सापडली होती. मनाचे दार हळुवारपणे उघडून मी आज निसर्गाचा रंगोत्सव म्हणा किंवा रंगपंचमी अनुभवली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com