Weight Loss : थंडीच्या दिवसांत वजन कमी करण्यासाठी वापरा 'या' टिप्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Weight

थंडीच्या हंगामात वाढणारे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी काही पदार्थ उपयोगी पडतात.

थंडीच्या दिवसांत वजन कमी करण्यासाठी वापरा 'या' सोप्या टिप्स

गाजराचा हलवा, गुलाबजाम, हॉट चॉकलेटचे थंडीच्या दिवसातं याचे सेवन अधिक केल्यास वजनवाढीसाठी कारणीभूत ठरु शकते. थंडीच्या हंगामात वाढणारे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी काही पदार्थ उपयोगी पडतात. हे पदार्थ फक्त वजन वाढवत नाहीत तर पोटाची चर्बी कमी करण्यासाठी काम करतात. थंडीच्या दिवसांत शरीर सुस्त होते. त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते. गाजराचा हलवा, गुलाबजाम, हॉट चॉकलेट यांच्या सेवनानेही वजन वाढण्याची दाट शक्यता असते.

गाजर - गाजरामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. यामुळे ते पचण्यास जड जाते. गाजर खाल्ल्यानंतर काही काळा भूक लागत नाही. गाजरामध्ये कॅलरी आणि नॉन स्टार्कीचे प्रमाण अधिक असल्याने वजन वाढत नाही.

दालचीनी - किचनमध्ये असलेली दालचीनी थंडीमध्ये वजन घटवते. शरीरामध्ये जेव्हा शुगर जेव्हा मेटाबोलाइज तयार करताता यामुळे वजन वाढते.

मेथीच्या बिया - थंडीच्या दिवसांत वजन घटवण्यासाठी मेथीच्या बियांचा वापर होतो. हे एखाद्या गुणकारी औषधप्रमाणं काम करते. या बिया रक्तातील शुगरची पातळी नियंत्रित ठेवते. ग्लैक्टोमेनन भूकेला नियंत्रित करण्यासाठी आणि माणसाच्या मेटाबॉलिज्मसाठी फायद्याचे असते.

पाणी - थंडीमध्ये शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन डीहायड्रेट होण्याचे प्रमाण अधिक असते. यामुळे मेटाबॉलिज्म सिस्टीमवर परिणाम होतो. या हंगामात गरम पाणी किंवा हर्बल टी हे शरीराला हायड्रेट नियंत्रात ठेवण्यास मदत करतात. याशिवाय भुकेला बऱ्याच कालावधीसाठी रोखून धरण्यासही मदत होते.

टॅग्स :Weight LossWinter