मंगळ मोहिमेचा ‘सारथी’

‘नासा’ने ‘मंगळा’वरील भविष्यकालीन मानवी मोहिमांचे ‘सारथ्य’अमित क्षत्रिय या भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाकडे दिले
NASA appoints Indian-origin scientist Amit Kshatriya to lead missions to Mars
NASA appoints Indian-origin scientist Amit Kshatriya to lead missions to Marssakal
Summary

‘नासा’ने ‘मंगळा’वरील भविष्यकालीन मानवी मोहिमांचे ‘सारथ्य’अमित क्षत्रिय या भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाकडे दिले

चं  द्रावर पाऊल ठेवणाऱ्या मानवाने आता त्यापुढे ‘मंगळ’ग्रहापर्यंत झेप घेण्याचा विचार केला आहे. त्यासाठी आवश्यक हालचालीही सुरू झाल्या असून, अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था - ‘नासा’ने ‘मंगळा’वरील भविष्यकालीन मानवी मोहिमांचे ‘सारथ्य’अमित क्षत्रिय या भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाकडे दिले आहे. त्यामुळे संपूर्ण जगाच्या नजरा मानवी मंगळ मोहिमेबरोबरच अमित क्षत्रिय यांच्याकडे वळणे साहजिकच. अंतराळवीरांना अवकाशातून सुरक्षितपणे पृथ्वीवर आणण्यासाठी सर्वात जबाबदार व्यक्ती म्हणून ‘अमित’ यांच्याकडे पाहिले जाते.

१९९६ ते २००० या कालखंडात अमेरिकेतील कॅलटेक विद्यापीठात गणिताचे पदवीशिक्षण (बीएस्सी ऑनर्स) पूर्ण करणारे अमित पुढे ऑस्टिन येथील टेक्सास विद्यापीठात दाखल झाले. तेथे २००३पर्यंत त्यांनी गणितातील पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. विशेष म्हणजे पदवीचे शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘नासा’मध्ये एक प्रकल्प केला.

नासाच्या ग्रहविज्ञान विभागातील ‘जेट प्रपोल्शन प्रयोगशाळे’त नेपच्युन ग्रहाच्या एका उपग्रहासंदर्भात त्यांनी पाच महिने संशोधन केले होते. पुढे पदव्युत्तर शिक्षणानंतर त्यांनी ऑगस्ट २००३ मध्ये ‘युनायटेड स्पेस अलायन्स’मध्ये नोकरी केली. तिथे अवकाश कुपीसाठी आवश्यक सॉफ्टवेअर तंत्रज्ञानावर त्यांनी काम केले.

पदवी शिक्षण सुरू असतानाच अमित यांनी संशोधनाची आणि करिअरची दिशा निश्चित केली होती. पुढील काही वर्षे त्याच प्रयोगशाळेत अवकाश कुपीतील मानवासाठीचे संगणकीय सिम्युलेशन आणि रोबोटिक टेलिऑपरेशन कौशल्यांचे ते प्रशिक्षण देत होते. २००६ मध्ये पुन्हा ते नासामध्ये दाखल झाले. अन् जॉन्सन स्पेस सेंटरमध्ये रोबोटिक्स कार्यान्वयन विभागात संचालक म्हणून दायित्व स्वीकारले.

२०१४ पर्यंत त्यांनी या विभागाचे नेतृत्व केले. २६ डिसेंबर २०१४ रोजी नासाचे ८५ वे उड्डाण संचालक म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकासाठी (आयएसएस) तब्बल एक हजार तासांहून अधिक काळ ‘फ्लाइट डायरेक्टर ऑफ रेकॉर्ड’ म्हणून त्यांनी काम पाहिले. एकात्मिक फ्लाइट ऑपरेशन्स टीमचे नेतृत्व केले, तर ‘स्पेस एक्स सीआरएस-८’ या खासगी मोहिमेचे प्रमुख उड्डाण संचालक म्हणून काम केले.

२०१७ ते २०२१ दरम्यान ते आयएसएस व्हेईकल ऑफिसचे ते उपव्यवस्थापक बनले. या काळात अवकाश उड्डाणांमध्ये अभियांत्रिकी, लॉजिस्टिक आणि हार्डवेअर प्रोग्रामाचे व्यवस्थापन टिकवून ठेवण्यासाठीची जबाबदारी होती. २०२१ मध्ये ते नासाच्या मुख्यालयात दाखल होत प्रशासनाचे उपसहसंचालक म्हणून जबाबदारी स्वीकारली होती.

अंतराळ स्थानकावरील ५०व्या मोहिमेच्या यशस्वी नेतृत्वाबद्दल त्यांना ‘सिल्व्हर स्नुपी’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. जो अंतराळवीरांच्या उड्डाणातील सुरक्षेमध्ये उत्कृष्ट योगदानासाठी दिला जातो. त्यांच्या या कामगिरीमुळे ‘नासा’ने चंद्रापलिकडील मोहिमांसाठी स्थापलेल्या स्वतंत्र कार्यालयाचे नेतृत्व क्षत्रिय यांच्याकडे सोपविले आहे.

चंद्र आणि मंगळावरील सर्व मानवी मोहिमांचे नियोजन व अंमलबजावणीची जबाबदारी आता त्यांच्याकडे असणार आहे. परग्रहावर पाऊल ठेवण्याच्या मानवी महत्त्वाकांक्षेला प्रत्यक्षात आणण्यासाठी एका सुवर्णयुगाचा पाया क्षत्रिय यांच्या नेतृत्वात घातला जाणार आहे. चंद्रापलीकडेही सूर्यमालेतील इतर ग्रहांवर आगेकूच करण्यासाठी दीर्घकालीन मानवी मोहिमांची आखणी आजचा माणूस करत आहे. त्यासाठीची संसाधने, प्रगत सॉफ्टवेअर तंत्रज्ञान आणि मानवी सुरक्षेसाठीचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी एका भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाकडे येणे निश्चितच अभिमानास्पद बाब आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com