नेल्लीची रक्तरंजित आठवण!

चार दशकानंतर नेल्ली येथे झालेल्या हत्याकांडाविषयी का लिहावे वाटत आहे
Nellie bloody memory
Nellie bloody memory sakal

चार दशकानंतर नेल्ली येथे झालेल्या हत्याकांडाविषयी का लिहावे वाटत आहे? असा प्रश्‍न तुम्हाला नक्कीच पडला असेल तर हाच नाही तर पुढील आठवड्यातही ‘राष्ट्रहिताच्या नजरेतून’ स्तंभासाठी मी याच विषयावर लिहिणार आहे. ही दोन भागांची मालिकाच असेल. आसाम आणि मेघालय यांच्या सीमेवर तणाव निर्माण झाला असताना दोन आठवड्यापूर्वी या विषयावर लिहिण्याविषयी माझी मित्रांसोबत चर्चा झाली

आसाम-मेघालय केडरचे १९६६ च्या बॅचचे आयएएस अधिकारी विनय कोहली यांना आदरांजली वाहण्यासाठी आम्ही काही दिवसांपूर्वी एकत्र जमलो होतो. त्यातील अनेकांनी आसाममध्ये काम केले आहे. त्यांना आसाम नरसंहाराविषयी बरीच माहिती आहे.

तेथे बोलताना ''इंदिरा गांधींनी आसाममध्ये कोणालाही नको असलेली निवडणूक सक्तीची करण्याचा निर्णय घेतल्यावर चर्चा झाली आणि अनेक आठवणी जाग्या झाल्या. माझे सहकारी प्रवीण स्वामी यांनी फेब्रुवारीच्या पंधरवड्यात झालेल्या रक्तरंजित दिवसाविषयी आठवण करून दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार ७००० लोक मारले गेले.

तणाव वाढला, हिंसाचार वाढला

आज मागे वळून पाहताना अनेक बाबी नजरेसमोर उभ्या राहत आहेत. पोलिसांनी दाखवलेली निष्क्रियता, त्यांचे दुर्लक्ष, त्यांची असंवेदनशीलता याबाबत समजते. नेलीमधील प्रकार घडण्याच्या आठवडाभरापूर्वी नॉनॉन्ग आणि डारांगमध्ये त्याची काहीशी झलक पहावयास मिळाली होती. एका अधिकाऱ्याने त्याविषयी सूचक टिप्पणीही केली होती. नेल्लीपासून अवघ्या पंधरा किलोमीटरवरील जागीरोडच्या आसपास आणि गुवाहाटीच्या पश्‍चिमेकडील चमरिया येथे दंगल उसळली. प्रारंभी जातीय दंगल समजून पाच जण मारले गेले

. पण कोणी कोणाला मारले पुढे येण्यापूर्वीच मोठ्या प्रमाणात अफवांना पेव फुटले. आदिवासी संतप्त झाले आणि त्यांनी सशस्त्र हल्ले चढविण्यास प्रारंभ केला. मतदानाच्या आदल्या दिवशी तणाव एवढा वाढला की राज्यात अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना वाढल्या. कचारींविरुद्धच्या विजयानंतर, अहोमानी जमातीच्या काही शाखांना नॉगॉन्गमध्ये राहण्यास परवानगी दिली होती. लालुंग, जे कचारी आणि अहोम या दोघांचे मालक होते, ते त्याचे मुख्य लाभार्थी होते. विसाव्या शतकाच्या शेवटी स्थलांतरित बंगाली मुस्लिम तेथे

येईपर्यंत लालुंगांनी ब्रह्मपुत्रा खोऱ्यातील सुपीक भागात मुक्तपणे वस्ती केली. जमिनीसाठी स्थलांतरितांच्या मोठ्या संघर्षात लालुंगांना सर्वात जास्त फटका बसला व त्रास सहन करावा लागला.

ब्रिटिश प्रशासकांनी ‘रेषा प्रणाली’ द्वारे आदिवासी जमिनीचे परकेपणा रोखण्याचा अनाठायी प्रयत्न केला. ज्या अंतर्गत घुसखोरीप्रवण जिल्ह्यांच्या विविध भागांत काल्पनिक रेषा रेखाटल्या गेल्या. बंगालींना स्थायिक करणाऱ्यांना ‘रेषा’ ओलांडण्यास मनाई करण्यात आली होती,

परंतु त्या ओलांडून त्यांनी आदिवासींचे शोषण केले. त्याचा परिपाक म्हणूनही हे हल्ले झाल्याचे सांगितले जाते. मुस्लिमांनी १६ फेब्रुवारी रोजी बकुलगुरी गावावर हल्ला केला. पद्मणीवरील आदिवासी प्रतिशोधामुळे, चार मृत्यूंमुळे, घडामोडींचा वेग वाढला आणि आगरवुड शहर होजाई आणि आसपास तणाव वाढला.

त्यानंतर नेल्ली येथील नरसंहाराला अप्रत्यक्ष हातभार लागला गेला. कारण प्रशासनाचे लक्ष संवेदनशील होजईवर केंद्रित झाले होते. त्यामुळे पोलिसांचे काहीसे दुर्लक्ष होते. त्यात स्थलांतरित मुस्लिमांनी लालुंगांच्या कुटुंबातील पाच जणांचे अपहरण केले. दुसऱ्या दिवशी त्यांचे मृतदेह सापडले आणि त्यांमधील दोन तरुण मुलींवर अत्याचार झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यावर नागबंधा गावच्या आसपासच्या चिडलेल्या आदिवासींनी २० हून अधिक स्थलांतरित मुस्लिमांवर हल्ला केला. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतरही लालूंग राजे (टोळीचे प्रमुख) यांनी जेथे जेथे स्थलांतरित आहेत त्यांच्यावर हल्ला करण्याचा निर्णय घेतला.

१७ फेब्रुवारीच्या सकाळी नॉगॉन्ग येथे डाकूंच्या नेतृत्वाखाली स्थलांतरित मुस्लिमांची एक मोठी फौज, प्रामुख्याने आसामी लोकांची वस्ती असलेल्या धिंग शहरावर पुढचा हल्ला करणार असल्याचा संदेश आला. त्यावर सीआरपीएफच्या जवानांनी गोळीबार केला आणि देशाच्या स्वतंत्र इतिहासात कायदा आणि सुव्यवस्था आटोक्यात आणण्यासाठी केलेला पहिला गोळीबार ठरला असावा. पोलिसांनी २०० वर गोळ्या झाडल्या आणि हल्लेखोरांपैकी सहा जणांचा त्यामध्ये मृत्यू झाला; मात्र तरीही हल्लेखोरांनी फारशी माघार घेतली नाही.

हिंसाचारामध्ये वाढ झाली

मुस्लिमांची प्रत्युत्तराची चाल ही त्यांच्यासाठी आपत्ती होती. किंबहुना, आमटाळा जंगलात आठवड्यानंतर हिंसाचाराच्या ताज्या फेऱ्यांमध्ये आणखी ६०-७० लोक मारले गेले. पोलिस एका बाजूला असताना जंगली प्रदेशांमध्ये हत्या आणि दंगली सुरू झाल्या होत्या. प्रथमदर्शनी सुमारे १२९० जणांची हत्या करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

गोहपूर, चौलखोवा चापोरी (नदीचे बेट) येथून खोईराबारीपासून उत्तरेकडे नेल्लीव्यतिरिक्त त्यापूर्वी दुसरे सर्वात मोठे हत्याकांड घडले. अशाप्रकारे दहा हजारांचा उन्मादी जमाव खोइराबारी येथील एका हायस्कूलमध्ये जमा झाला. गावात पाचपेक्षा जास्त पोलिस नव्हते. त्यावेळी जमावाने बंगाली गावांना वेढा दिला आणि जोरदार हल्ला चढविला.

त्याच बरोबर, आसामी जमावाने पश्चिमेकडील गोरेश्‍वरच्या बंगाली हिंदू भागावर हल्ला केला आणि सुटकेचे सर्व मार्ग बंद केले. येथे मोठ्या प्रमाणावर नरसंहार झाला.एक स्थानिक या विषयी सांगताना म्हणाला,‘‘ तीन मार्च रोजी आम्ही त्या ठिकाणी पोचलो तेव्हा, जखमी वाचलेले भीतीने लपून बसलेले होते. ते बाहेर येण्यास तयार नव्हते. जिकडे पाहू तिकडे मृतदेह पडलेले होते.

‘थेट गोळीबार, तरीही जमाव आला’

पहिल्या हल्ल्यानंतर पाच दिवसांनंतर, काही वाचलेले तेथून बाहेर पडण्यात यशस्वी झाले आणि त्यांनी या हत्येची कहाणी मंगलदाईच्या पूर्वेकडील धुला आणि थेकेराबारी या स्थलांतरित बहुसंख्य गावांतील लोकांपर्यंत पोहोचवली. यामुळे आसामी गावकऱ्यांवर स्थलांतरित मुस्लिमांकडून हल्ले झाले, त्यामध्ये ७० लोक मारले गेले.

दारंग आणि नॉगॉन्ग येथील हिंसाचाराने लक्ष वेधून घेतले; मात्र गोलपारा या संघर्षात ३००-४०० जणांचा बळी घेतला आणि उत्तर लखीमपूरमध्ये काय चालले हे कोणालाच कळत नव्हते. तेथे आसामी हिंदू आणि हरवलेल्या आदिवासी टोळ्यांनी गावांवर हल्ले केल्यामुळे हजारावर बळी गेले. वाचलेल्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र काहींवर हल्ला करून त्यांना मारण्यात आले. या एकूण नरसंहारामध्ये सात हजारांवर बळी घेतल्याचे सांगण्यात येते. जातीय, वांशिक किंवा भाषिक अशा कोणत्याही एका सामान्य शब्दांखाली झालेला हा कटू शंघर्ष होता. ज्याची धग आजही त्या परिसरात जाणवत असते.

आसाममधील नेल्ली येथे १९८३ मध्ये झालेल्या हत्याकांडाला चाळीस वर्षे पूर्ण होत आहेत. नेल्लीकडे जाणारा रस्ता तेव्हा रक्ताने माखलेला होता आणि परिसरामध्ये मृतदेहांचे ढिगच्या ढिग पडलेले होते. आजही आठवले तरी अंगावर शहारे उमटतात. आसाममध्ये कोणालाही नको असलेली निवडणूक त्याचवेळी लादलेली होती.

(अनुवाद: प्रसाद इनामदार)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com