

‘पंतप्रधान होण्याची तयारी असेल तर पाठिंबा देऊ, अशी ऑफर विरोधी पक्षातील एका पॉवरफुल नेत्याने दिली होती, पण आपणच नको म्हटले,’ असा गौप्यस्फोट आमचे परममित्र मा. नितीन गडकरीसाहेबांनी केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडणे स्वाभाविक होते. विरोधी पक्षांकडून अशी ऑफर येणे तसे इंपॉसिबल असते.