पाकिस्तानी राज्यकर्त्यांना घरचा आहेर (मर्म)

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 डिसेंबर 2016

पाकिस्तानचा खोटेपणा, दहशतवादाबाबतची दुटप्पी भूमिका आणि तेथील लोकशाही संस्थांचे तकलादूपण यामुळे त्या देशाच्या विश्‍वासार्हतेचा आलेख नेहमी घसरताच राहिलेला आहे. तरीही रेटून बोलत राहण्याची, भारताच्या विरोधात गरळ ओकण्याची एकही संधी तेथील लष्कर, "आयएसआय' व राज्यकर्ते सोडत नाहीत. मुंबईवरील हल्ल्यात महम्मद अजमल कसाब याला जिवंत पकडल्यानंतर त्याचा रीतसर खटला चालवून भारताने पाकिस्तानी धोरणाची लक्तरेच चव्हाट्यावर आणली होती. दहशतवादाला चिथावणी देण्याच्या त्या देशाच्या कितीतरी कारवाया भारताने पुराव्यानिशी जगासमोर आणल्या. त्याविषयी इन्कार करणे अवघड होते. तरीही तसा प्रयत्न तर त्यांनी केलाच.

एरवीही "भारत आमच्या अंतर्गत व्यवहारांत हस्तक्षेप करतो', असा धोशाही पाकिस्तानी नेत्यांकडून लावला जात असतो. कुलभूषण जाधव या भारतीय नौदलातील माजी अधिकाऱ्याला ताब्यात घेऊन तेथील लष्कराने ते भारतासाठी हेरगिरी करीत असल्याचा ठपका ठेवला. भारत बलुचिस्तानमध्ये ढवळाढवळ करीत असल्याचा आरोपही करण्यात आला. पण पुरावा सादर केल्याशिवाय नुसत्या आरोपावर कोण विश्‍वास ठेवणार? त्याविषयी पाकिस्तानी सिनेटमध्ये जी चर्चा झाली, तीत पंतप्रधानांचे सल्लागार सरताझ अझीज यांनी स्वच्छच सांगून टाकले, की जाधव यांच्या विरोधात ठोस पुरावे उपलब्ध झालेले नाहीत. जे काय आहे, ते फक्त आरोप आहेत.

याविषयीचे वृत्तही "डॉन'सह पाकिस्तानातील विविध प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध झाले. पाकिस्तान सरकारला ते वृत्त चांगलेच झोंबले असून, सरकारी प्रवक्‍त्याने घाईघाईने खुलासा करून "अझीज असे म्हणालेच नाहीत', असा पवित्रा घेतला आहे. प्रसिद्ध झालेल्या बातम्या खऱ्या की सरकारी प्रवक्ता सांगतो ते? हा प्रश्‍न तूर्त तरी अनुत्तरित आहे, हे मान्य केले तरी सिनेटच्या त्याच बैठकीत पाकिस्तान पीपल्स पार्टीचे फरहतुल्ला बाबर यांनी दहशतवादाला आळा घालण्यात सरकारला पूर्णपणे अपयश आल्याचा आरोप केला. "निवडणुकीच्या रिंगणात "नॉन स्टेट ऍक्‍टर्स' उतरताहेत आणि सरकार स्वस्थपणे पाहात आहे,' अशी घणाघाती टीका त्यांनी केली. जहानजेब जमालनिदी यांनीही सरकार दहशतवाद्यांबाबत सॉफ्ट असल्याची टीका करून त्याबद्दल संताप व्यक्त केला. आता याविषयी पाकिस्तानी सरकारला काय म्हणायचे आहे? प्रवक्‍त्याने त्यासंदर्भात काही पत्रक काढल्याचे ऐकिवात नाही!

Web Title: pakistani rulers lashed on home ground