

piyush pandey
sakal
पॅरिसच्या रस्त्यांवरून फिरत असताना पीयूष पांडे यांच्याशी झालेलं बोलणं आठवत होतं. जुनी शहरं, त्यांचं दिसणं, त्याचं सौंदर्य आणि ते वर्षानुवर्ष कायम ठेवण्यासाठी समाजाने आणि व्यवस्थेने केलेली सजग धडपड याविषयी आम्ही बोललो होतो. अर्थात आमचं बोलणं झालं होतं म्हणजे ते बोलत होते, अन् मी ऐकत होतो. निमित्त होतं ‘पांडेपुराण’ या मी केलेल्या ‘पांडेमोनियम’ या त्यांच्या इंग्रजी पुस्तकाच्या मराठी अनुवादाच्या प्रकाशनाचं. तेव्हा ते आवर्जून पुण्यात आले होते.