राजधानी दिल्ली : पंधरा वर्षांनंतर राजकारणाचे एक वर्तुळ पूर्ण

अण्णा हजारेंच्या लोकपाल आंदोलनापासून ते ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या आभासी वादळापर्यंत, पंधरा वर्षांनी देशाचे राजकारण पुन्हा सत्तांतर घडवू शकणाऱ्या नव्या लाटेच्या उंबरठ्यावर
From Jan Lokpal to 'Cockroach Janata Party': A Cyclical Shift in Indian Politics

From Jan Lokpal to 'Cockroach Janata Party': A Cyclical Shift in Indian Politics

esakal
Updated on

सुनील चावके, ‘सकाळ’च्या नवी दिल्ली ब्यूरोचे प्रमुख

आणीबाणी आणि ‘बोफोर्स’चा अपवाद वगळता केंद्रातील सत्ताधारी पक्षाविरुद्ध सर्व विरोधी पक्ष एकत्र आले तरी त्यांना केंद्रात सत्तांतर घडवून आणण्याइतपत लाट निर्माण करणे शक्य झाले नाही. विरोधी पक्षांच्या देशव्यापी आंदोलन छेडण्याच्या क्षमतेला मर्यादा येतात, हे राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’तून दिसले. पण सत्तांतर घडवून आणणारी लाट ‘त्रयस्थ’ शक्तीकडून निर्माण होऊ शकते आणि त्याचे लाभार्थी मुख्य प्रवाहातील विरोधी पक्ष ठरतात, हे अण्णा हजारेंच्या लोकपाल आंदोलनाने दाखवून दिले होते. ‘कॉकरोच जनता पार्टी’मुळे उठलेल्या आभासी वादळाने अशा आंदोलनांमध्ये नवोन्मेषी आविष्काराची भर पडू पाहात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com