ढिंग टांग : शाही कोतवाली : शहर पुणे..!

Pune Shah Kotwal Visit and Political Satire : पुण्यात शाही कोतवालांच्या आगमनानंतर राज्यकर्त्यांची धावपळ आणि कायदा सुव्यवस्थेवरील चर्चा रंगते मात्र शहरातील वैशाली रुपाली बंद झाल्याचा प्रश्न सर्वाधिक गंभीर ठरल्याची उपरोधिक मांडणी या राजकीय व्यंगलेखातून केली आहे अशी खुमासदारपणे
Pune Shah Kotwal Visit and Political Satire

Pune Shah Kotwal Visit and Political Satire

esakal

Updated on: 

पुण्यनगरीच्या हद्दीत नवा शाही कोतवाल आल्याचे वर्तमान पसरले, आणि अवघे शहर शहारले. शहारले म्हंजे अक्षरशः शहारले. कारण कोतवालाचे नावच मुळी शहा असे होते. पुण्यपत्तनी हवाई अड्ड्यावर मान्यवर शाही कोतवालांचे आगमन झाले, तेव्हापासून दोन दिवस पुण्यात उत्साहास खळ नव्हता. खळांची व्यंकटी सांडिली. भल्यांना धीर आला. ठिकठिकाणी जाऊन शाही कोतवालांनी कायदा व सुव्यवस्थेचा जायजा घेतला, नागरिकांस धीर दिला. नागरिकांचा तगादा मोठाच होता. (तगादा : तक्रारी, गाऱ्हाणी, दावे) पुणेच ते!! शाही कोतवालांनी समर्थपणे सारे ऐकून घेतले.

Loading content, please wait...