
S. L. Bhyrappa
sakal
- सविता शिंदे
आज दुपारी डॉ. उमा कुलकर्णी यांचा भैरप्पा गेले, हा संदेश वाचला आणि मागच्या वर्षी डॉ. भैरप्पा यांची झालेली भेट आठवली. हा भाग्ययोग जुळून आला तो डॉ. उमा कुलकर्णी यांच्या घरी. पुणे विद्यापीठ आणि भांडारकर प्राच्य विद्या संशोधन केंद्र या ठिकाणी आयोजित चर्चासत्राच्या निमित्ताने भैरप्पा पुण्यात आले होते.