
S. L. Bhyrappa
sakal
- मुकेश थळी
कन्नड कादंबरीकार एस. एल. भैरप्पा यांचे निधन झाले. वय होतं ९४ वर्षे. २६ कादंबऱ्या लिहिणारे भैरप्पा हे चोवीस तास कार्यरत लेखक होते. अभ्यास, चिंतन, मनन, संशोधन हे आवडीने करणारे. आधुनिक भारतीय कादंबरीकार म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला. त्यांच्या ‘पर्व’ आणि ‘मंद्र’ या कादंबऱ्या मी बारकाईने वाचल्या. आवडल्या. ‘वंशवृक्ष’, ‘धर्मश्री’, ‘दाटू’, ‘आवरण’ या कादंबऱ्याही विलक्षण आहेत.