

The satirical piece blends social media culture, political alliances, and public movements through witty Marathi storytelling.
Sakal
सदू : (प्रेमभराने) दादूराया, तुझं मनसे अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा! तुम जिओ हजारो साल! साल के दिन हो पचास हजार!!
दादू : (सद्गदित होऊन) सदूबाळा, किती रे गोड आहेस! इतका गोड की नुसता शेकहँड केला तरी शुगर वाढेल आमची!!
सदू : (आणखी प्रेमाने) दादूराया! ही घे फुलं! लाल लाल गुलाबाची फुलं!! रोझेस आर रेड, व्हायोलेट्स आर ब्ल्यू, नो नाइफ कॅन कट आवर बंधुप्रेम इंटु टूऽऽ..!
दादू : (कौतुकाने ओसंडून) कोसो सुचतॉ तुला अं!! बघता बघता इंग्रजीत कविता केलीस!
सदू : (ओशाळून) हल्ली मी इन्स्टावर बराच वेळ असतो!!
दादू : (ममतेने) छान आहेत फुलं!! मी काचपात्रात ही फुलं खुपसून त्यात ॲस्प्रोची गोळी घालून ठेवीन! चांगली आठ-दहा दिवस टवटवीत आणि टप्पोरी राहतात!!