esakal | ढिंग टांग : कोकण पर्यटन!
sakal

बोलून बातमी शोधा

konkan tour

कोकणात ज्या ज्या ठिकाणी गेलो, त्या त्या ठिकाणी लोक माहिती देत होते : या अमक्‍या ठिकाणी मा. बारामतीकरसाहेब उभे होते! त्या तमक्‍या जागेवर मा. उधोजीसाहेबांनी फोटो काढले! वगैरे.  

ढिंग टांग : कोकण पर्यटन!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

आजची तिथी : प्रमादीनाम संवत्सर श्रीशके १९४२ ज्येष्ठ कृ. षष्ठी.
आजचा वार : थर्सडेवार.
आजचा सुविचार : गोमु माहेरला जाते हो नाखवा, हिच्या घोवाला कोकण दाखवा...हैया हो!!
.........
नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: ( १०८ वेळा लिहिणे) सध्या कोकणाच्या दौऱ्यावर जाऊन ऱ्हायलो आहे! फारा दिवसांत गेलो नव्हतो. वादळाने कोकणात उधम मचवला. त्याचा जायजा घेण्यासाठी जाऊन ऱ्हायलो आहे. ब्याग भरली, मास्क चढवला आणि लागलीच निघालो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अहाहा! किती सुरम्य कोकण!! समुद्र बघायला मला खूप आवडते. आमच्या नागपुरात समुद्र नाही. (तसा बारामतीला तरी समुद्र कुठे आहे? आपण तर नाही बघितला बुवा!! ) म्हणून मला मुंबई भारी आवडायची. कारण तिथे समुद्र होता. समुद्राकाठी मुंबईत राहाता यावे, म्हणून मी खूप प्रयत्न केले; पण...असो. तो आता भूतकाळ झाला...

कोकणात जायला हवे, असे मी आमच्या मा. चंदुदादा कोल्हापूरकरांना म्हणालो. ते म्हणाले, ‘‘कशाला जाताय? सध्या बुकिंग फुल्ल आहे तिथं!’’ मी च्याटच पडलो.

‘‘अहो, एवढं भयानक वादळ येऊन गेलं! बुकिंग कसं फुल्ल होईल?’’ मी विचारले. त्यावर त्यांनी बोटे मोडीत टुरिस्टांची यादीच वाचून दाखवली. ऐकून हैराण झालो. एकंदरीत कोकणात जाणारे आपण एकटे नाही तर!...पण हल्ली जो उठतो तो कोकणात जायला निघतो आहे, तर आपण तरी कां मागे राहावे? या विचाराने ब्याग उचलली आणि निघालो झाले!

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

टुरिस्टांच्या यादीत आणखी एक भर इतकेच! उदाहरणार्थ, वादळापाठोपाठ आमचे (माजी) परममित्र मा. उधोजीसाहेब अलिबागेला (लाँचने) वादळी भेट देऊन आले. पर्यावरणातले बदल टिपण्यासाठी त्यांनी सोबत पर्यावरणमंत्री चि. विक्रमादित्यजींना नेलेच होते. आमचे आणखी एक परममित्र (तेच...पहाटेचा शपथविधीवाले!) मा. दादासाहेब बारामतीकर ऊर्फ धाकले धनी मावळात फिरून आले. आमचे ठाण्याचे (माजी) मित्र मा. एकनाथभाई शिंदेजी पडत्या फळाची आज्ञा मानून लगोलग कोकणात जाऊन आले. आमच्या पक्षाचे मा. प्रवीणजी दरेकरभाऊ जाकिट घालून पार श्रीवर्धनेस जाऊन आले. आमचे आणखी एक चुलत मित्र मा. सुनीलजी तटकरे हे तर अलिबागेचेच; पण इतकी माणसे जातायत तर आपणही कुठे तरी दौरा काढायला हवा, असे वाटून तेदेखील उगीचच आपल्याच गावात फिरून आले!! 

कोकणात जातोच आहे, तर आपल्या मा. राणेदादांना भेटून यावे, म्हणून त्यांना फोन केला. त्यांना विचारले, ‘‘येताय का?’’ ते म्हणाले ‘‘खंय?’’ म्हटले, ‘‘कोकणात!’’ त्यावर ते ‘नको’ म्हणाले की ‘हो’, हेही धड कळले नाही. नुसते ‘कित्याक...हंयसर...शिरा पडल्या...कोंबो कापूक होयो...’ असले काही शब्द तुटक तुटक ऐकू आले. वादळानंतर कोकणात नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, हे कळले. जाऊ दे. 

दौऱ्यावर निघण्यापूर्वीच कोकणात सरकारने दिलेली मदत तुटपुंजी असून, किमान सात-साडेसात हजार कोटी रुपये सरकारने काढून दिले पाहिजेत, अशी मागणी करून ठेवली. कोकणात ज्या ज्या ठिकाणी गेलो, त्या त्या ठिकाणी लोक माहिती देत होते : या अमक्‍या ठिकाणी मा. बारामतीकरसाहेब उभे होते! त्या तमक्‍या जागेवर मा. उधोजीसाहेबांनी फोटो काढले! वगैरे. नाही म्हटले तरी मन खट्टू झाले. दौरा आटोपून मुक्कामाच्या ठिकाणी निघालो. तर एका टुरिस्टाने हटकले. त्याच्या तोंडावर मास्क होता. मी ओळखले नाही. त्याने विचारले, ‘‘साहेब, कसा वाटला आमचा कोकणचा समुद्र?’’