esakal | ढिंग टांग : पूर्वतयारी!
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing-Tang

नमोजीभाई : (नमस्काराच्या पोजमध्ये) ॐ मित्राय नम:!
मोटाभाई : (घाईघाईने खोलीत शिरत दचकून) ओह, हरे राम! आ शुं करे छे?
नमोजीभाई : (झपकन खाली वाकत) हुं हुं!
मोटाभाई : (गोंधळून) माने शुं?
नमोजीभाई : (झपकन साफ आडवे होत) हुंफ हूंऽऽ..!
मोटाभाई : (घाबरून) अरे अरे! काय झ्याला?

ढिंग टांग : पूर्वतयारी!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

नमोजीभाई : (नमस्काराच्या पोजमध्ये) ॐ मित्राय नम:!
मोटाभाई : (घाईघाईने खोलीत शिरत दचकून) ओह, हरे राम! आ शुं करे छे?
नमोजीभाई : (झपकन खाली वाकत) हुं हुं!
मोटाभाई : (गोंधळून) माने शुं?
नमोजीभाई : (झपकन साफ आडवे होत) हुंफ हूंऽऽ..!
मोटाभाई : (घाबरून) अरे अरे! काय झ्याला?
नमोजीभाई : (भराभरा अंग मोडत सरळ होत) अरे एटला बुमाबोम शा माटे करे छे! एने सूर्यनमस्कार कहे छे!
मोटाभाई : (थकून मटकन बसत) मी केटला घाबरला!
नमोजीभाई : (पुन्हा नमस्काराच्या पोजमध्ये) ॐ रवये नम:! आजपासून मी बारा सूर्यनमस्कार घालणार!
मोटाभाई : (ऐकूनच थकून जात) एटली अंगमेहनत कसाला करते? तेची काय जरुरत नाय हाय!!
नमोजीभाई : (भराभर सूर्यनमस्कार पुरा करत) नाय कसा! पोलिटिक्‍समां फिटनेसा बहु महत्वय छे! तमे जुओ, छ माह मां हू बॉडी एकदम कडक बनावीश!
मोटाभाई : (भक्‍तिभावाने) चोक्‍कस!
नमोजीभाई : (पुन्हा नमस्काराच्या पोजमध्ये) ॐ सूर्याय नम:!! तमे पण शरु करजो! 
मोटाभाई : (नुसत्या कल्पनेने घाम फुटून) ना रे बाबा! योगा, वर्जिश आपला काम नाय!
नमोजीभाई : (दणक्‍यात नमस्कार पूर्ण करत) नाय कसा! मी बद्धा कॅबिनेटला कंपल्सरी करणार हाय! हरेकाने सूर्यनमस्कार घातलाच पायजे!!
मोटाभाई : (अजीजीने) आ तो जबरदस्ती छे, नमोजीभाई! ए ना करो!!
नमोजीभाई : (निर्धाराने) ॐ भानवे नम:! करवुज पडसे! छ महिना मां बॉडी एवढी टणक होयाला पायजे के किती पण डंडा मारला तरी नो प्रोब्लेम!!
मोटाभाई : (हबकून) डंडा? डंडा तो मारी हाथ मा छे! 
नमोजीभाई : (पाचव्या सूर्यनमस्काराच्या तयारीत) ॐ खगये नम:!...आवत्या सात-आठ महिन्यांत मला डंडे मारण्याची अनाउन्समेंट झाली हाय! सहा महिन्यांत मी एकदम टणक होऊनशी ज्याणार! माझ्या पीठवर कितीही डंडे मारले तरी काहीही होणार नाय! तमे पण तय्यार रहो!
मोटाभाई : हूं होम मिनिस्टर छूं! डंडा मारी पासे छे!
नमोजीभाई : (आश्‍चर्याने) ॐ पूष्णे नम:! तमे खबर नथी? आपडो कोंग्रेसवाळा मने डंडा मारवाना प्लॅन करे छे!
मोटाभाई : (धक्‍का बसून) तो हवे शुं करवानुं?
नमोजीभाई : (पुन्हा सूर्यनमस्काराकडे एकाग्र होताना) ॐ हिरण्यगर्भाय नम:...तमे पण सांभळ्यो मोटाभाई! 
मोटाभाई : (चिंताग्रस्त) मला पण डंडे पडणार का?
नमोजीभाई : (दिलासा देत) ॐ मरीचये नम:..तसा काय अनाउन्समेंट नाय झ्याला! पण तमारा नाम हिटलिस्ट उप्पर छेज ने!!  
मोटाभाई : हां...नाम तो छे! पण-
नमोजीभाई : (निश्‍चयाने) ॐ आदित्याय नम:...केबिनेटमधल्या बद्धा मिनिस्टर लोगांना सूर्यनमस्कार कंपल्सरी करून टाका! 
मोटाभाई : (घायकुतीला येत) मने तो गमतो नथी आ वर्जिश ने योगा ने फलाणा ने ढिकाणा!! हुं शुं करुं?
नमोजीभाई : (विचार करता करता) ॐ सवित्रे नम:.. 
मोटाभाई : (हैराण) बोलो ने, नमोजीभाई! प्लीऽऽज!
नमोजीभाई : (अखेर आयडिया सुचल्यागत) ॐ अर्काय नम:..! तमे हेल्मेट वापरो! 
मोटाभाई : (खोल आवाजात) देशाचा होम मिनिस्टर हेल्मेट घालून फिरतो, हे कसा दिसेल?
नमोजीभाई : (दीर्घ श्‍वास घेत) ॐ भास्कराय नम:...देशाचा होम मिनिस्टर डंडे खातो हे पण खराबच दिसणार मोटाभाई! जे श्री क्रष्ण!