esakal | ढिंग टांग : प्रिस्क्रिप्शन!
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing-Tang

डोलांडतात्या : (फोन फिरवत) हाय देअर...इज धिस नमोजी मेडिकल स्टोअर? डोलांड हिअऽऽ...!
नमोजीभाई : (मधाळपणे) जे श्री क्रष्ण, डोलांडभाई...केम छो! हुं नमोजी वात करुं छुं! जेनेरिक दवानां स्टोकिस्ट अने ड्रगिस्ट!! बद्धा सारु छे ने?
डोलांडतात्या : (वैतागून) नथ्थिंग इज सारु हिअऽऽर...थिंग्ज आर ॲज बॅड ॲज...(शब्द न सुचून) एनिथिंग!
नमोजीभाई : (दिलासा देत) दिल खट्‌टु ना करजो डोलांडभाई! चिंता नथी करवानी! हुं छूं ने!!

ढिंग टांग : प्रिस्क्रिप्शन!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

डोलांडतात्या : (फोन फिरवत) हाय देअर...इज धिस नमोजी मेडिकल स्टोअर? डोलांड हिअऽऽ...!
नमोजीभाई : (मधाळपणे) जे श्री क्रष्ण, डोलांडभाई...केम छो! हुं नमोजी वात करुं छुं! जेनेरिक दवानां स्टोकिस्ट अने ड्रगिस्ट!! बद्धा सारु छे ने?
डोलांडतात्या : (वैतागून) नथ्थिंग इज सारु हिअऽऽर...थिंग्ज आर ॲज बॅड ॲज...(शब्द न सुचून) एनिथिंग!
नमोजीभाई : (दिलासा देत) दिल खट्‌टु ना करजो डोलांडभाई! चिंता नथी करवानी! हुं छूं ने!!
डोलांडतात्या : (उतावीळ होत) आम्हाला हायड्रोक्‍सी ख्लोरोख्विन कधी देणार?
नमोजीभाई : (न कळून) शुंऽऽ...ऐकू येत नाय! लाइन मां कछु खराबी छे के?
डोलांडतात्या : हायड्रोक्‍सी ख्लोरोख्विन!
नमोजीभाई : (भोळेपणाने) जरा स्पेलिंग बतावजो तो..!
डोलांडतात्या : (घायाळ सुरात) एवढ्या मोठ्या नावाचं स्पेलिंग कसं सांगणार? मीसुद्धा हे नाव आत्ताच ऐकलंय! ते औषध तातडीने पाठवा! अर्जंट होम डिलिव्हरी!! ऑऽऽक छी!! 
नमोजीभाई : (पेडगावच्या शहाण्यासारखे) सर्दी झालीये का? काळजी घ्या हां! रोज बप्पोरे गरम पाण्यात मीठ घालूनशी गुळण्या करा! हेंडवॉश पण इस्तेमाल करजो! मास्क वापरते ने?
डोलांडतात्या : (भडकून) दुनियादारी नका शिकवू हो! औषध पाठवा ताबडतोब!
नमोजीभाई : (नम्रपणेच...) अरे, डोलांडभाई, कसा पाठवणार दवा? लोकडाऊन च्यालू छे! माल नथी आवतो!! दुसरा कुठला दवा पायजे, तो बतावो! 
डोलांडतात्या : (तुच्छतेने) एरवी तुम्ही मलेरियाला वापरता, तेच औषध हवंय! पाठवा लौकर!
नमोजीभाई : (धक्‍का बसून) कोणाला झ्याला मलेरिया? मलेरिया तो मच्छरमुळे होतो! मच्छर मारायची अगरबत्ती पाठवू का? एकदम फर्स्ट क्‍लास छे! 
डोलांडतात्या : (भयंकर संयम राखत) आऽऽऽ....***!! एऽऽ...मला राग आला ना, तर महागात पडेल! बऱ्या बोलानं आमचं औषध पाठवा, नाहीतर माझ्याशी गाठ आहे! बघून घेईन!! 
नमोजीभाई : (कावेबाजपणे) अरे डोलांडभाई, तमे तो आपडो माणस छे!..छेल्ला वखत तुम्ही दुकानमधी आला होता, तवा मी प्रेमाने त्रणसोबाईस वेळा शेकहेंड केला होता, अने ओगणीस वेळा मिठी मारली होती! दोस्ताला गाळी कशाला देते?
डोलांडतात्या : (अधीरपणे) बरं बरं! औषध पाठवताय ना? मलेरियाचं?
नमोजीभाई : त्याचा असा हाय के, अनाफेलिस डासाची बायडी असते ने, ती माणसला उंगमधी च्यावते!
डोलांडतात्या : (गोंधळून) कशामध्ये चावते?
नमोजीभाई : उंग...उंग...माने नींद...झोपेमधी च्यावते! मग माणसला मलेरिया होते! तवा डोक्‍टरलोग हायड्रोक्‍सी क्‍लोराक्‍विन देते! एना साइड इफेक्‍ट पण छे!!
डोलांडतात्या : (डोक्‍याची खिट्टी उडून) तेल लावत गेले हो साइड इफेक्‍ट! औषध पाठवा अर्जंट! इथे जीव चाललाय! आणि तुम्हाला हे सुचतंय!
नमोजीभाई : (व्यापारी सुरात) क्रिपया प्रतीक्षा किजिए, आप कतार में हैं! आमच्या नेबरलोगांनी आधीच ओर्डर प्लेस केला हाय, त्यांना दवा देऊन झ्याला के पछी तमे आपीश! ओक्‍के? 
डोलांडभाई : (हातपाय आपटत) आत्ताच्या आत्ता हायड्रॉक्‍सी क्‍लोराक्‍विन पाठवा, नाहीतर...नाहीतर-
नमोजीभाई : (थंडपणे) ओके ओके, पाठवतो! पण तमारी पासे डोक्‍टरना प्रिस्क्रिप्शन छे के? नथी? ओह, मग प्रोब्लेम हाय! डोक्‍टरच्या चिठ्ठीबिगर हायड्रोक्‍सी क्‍लोरोक्‍विन बेचना मना छे! सॉरी हां डोलांडभाई, टेक केअर! जे श्री क्रष्ण!!