esakal | ढिंग टांग : मुशायरा-इ-चायना!
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग : मुशायरा-इ-चायना!

गेले काही दिवस आम्ही चांगल्याच शायराना अंदाजमध्ये आहो! नाही, त्याचा दुकानेशराबाची कवाडे उघडली जाण्याशी काहीही तआल्लुक (पक्षी : संबंध) नाही. तिथे लडाखमध्ये दर्या-इ-पेनगाँगच्या साहिल (पक्षी : किनारा) वर पडोसी-ए-हिंदोस्तां यानेकी चायनाच्या सिपाहीसलारांना मुंहजोरी सुरू केली आणि इथे आम्हाला शायरीचा बुखार चढला.

ढिंग टांग : मुशायरा-इ-चायना!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

गेले काही दिवस आम्ही चांगल्याच शायराना अंदाजमध्ये आहो! नाही, त्याचा दुकानेशराबाची कवाडे उघडली जाण्याशी काहीही तआल्लुक (पक्षी : संबंध) नाही. तिथे लडाखमध्ये दर्या-इ-पेनगाँगच्या साहिल (पक्षी : किनारा) वर पडोसी-ए-हिंदोस्तां यानेकी चायनाच्या सिपाहीसलारांना मुंहजोरी सुरू केली आणि इथे आम्हाला शायरीचा बुखार चढला. बुखार चढला म्हणून आम्ही काही काळ हैराण होतो. कां की, सध्या बुखार आलेल्या आदमीचे काही सच (पक्षी : खरे!) नसते. डोक्‍याला बुखारगिनतीची बंदूक लावून सरळ कमऱ्यात बंद करतात! लेकिन त्या बुखारातच आम्ही सटासट दोन-तीन अशआर आणि वजनदार शेर लिहून काढले, तेव्हा कुठे दिलाला आराम पडला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एक दिन अचानक एक अलौकिक (पक्षी : सॉल्लिड!) शेर पढने में आया! अर्ज किया था-
हमको मालूम है, सीमा की हकिकत लेकिन,
दिल को खुश रखने को ‘शहा-यद’ ये खयाल अच्छा है!
...क्‍या खूब लिखा था! वाहव्वा!! सीमा की हकिकत!! आह!! काही काळ आम्ही इस्कूली जमान्यात गेलो. पण जल्द अज जल्द बाहर आलो. आमच्या दौर-ए-सकूल (पक्षी : शाळकरी काळात) मधल्या सीमा सोनपापडीकरशी या शेराचा काहीही रिश्‍ता नव्हता. सरहद्दीशी होता! दरिया-ए-पेनगांगच्या साहिलवर चायनीज सिपाह्यांनी केलेली कुरापात याला कारणीभूत होती. ‘शहायद’ हा लब्ज आमचा दिल जिंकून गेला. शहायद! शायद हा लब्ज मालूम होता, शहद हादेखील गोड लब्ज दिलात बसला होता; पण शहायदमधून जे शहद ठिबकत होते, त्याला उपमा जन्नतमधल्या खिरीचीच द्यायला हवी. रहने दो. (पक्षी : असो.)
यकायक पाठोपाठ आणखी एक शेर येऊन थडकला. अर्ज किया था-
हाथ को दर्द हो तो दवा कीजे.
हाथ ही दर्द हो तो क्‍या कीजे?
वाह भई, वाह! क्‍या खूब फर्माया था!  इथे माशुक आपल्या दिलवराला सांगते आहे, ‘‘तुझा हात दुखत असेल तर काही दुखदबाव लेप किंवा लुकमाने हयात तेलाचा मसाज कर, पण आख्खा हातच दुखणे बनून ऱ्हायला असेल तर काय करशील?’’ आह! किती अर्थपूर्ण शेर होता. ऐसे शायर के लिए तो हमारा दिल गुलशन गुलशन हिंडत असतो! पुन्हा रहने दो.
हा शेरसुधा सीधासाधा (पक्षी : साधासुधा) नव्हता. दरिया-इ-पेनगांगच्या साहिलवर हातात तमंचा (पक्षी : बंदूक हं! खरीखुरी!!) घेऊन उभा असलेल्या चिनी सिपाह्याला पाहूनच हा शेर सुचला असणार, याबद्दल आमच्या मनात तरी काही शक नाही! 
चिनी सिपाह्यांकडल्या बंदुका, उडन खटोले (पक्षी : हेलिकाप्टरे), तोफा, गाडा-इ-रन (पक्षी : रणगाडे) वगैराह वगैराह कूडा कचरा सामान बघून आपल्या हिंदोस्तानी शायरांना बिलकुल डर वाटली नाही. त्यांच्या ताणलेल्या बंदुकांच्या समोर त्यांनी मुशायरा सुरू केला, याचा आम्हाला गुरुर (पक्षी : अभिमान) वाटला.
कोण होते हे दिलेर हिंदोस्तानी शायर? नहीं मालूम? तो सुनिये : ते होते, शेरोशायरी पढण्यात मशगूल असलेल्या जनाब ‘हाथ’ देहलवी आणि जनाब पंडत राजनाथसिंह ‘कमल’ (लखनौवाले)!! त्यांना आम्ही बधाई दिली. आणि विचारले, की ‘चीनी तमंचों के सामने शायरी पढते हो? क्‍या आपको डर नहीं लगता?’ 
दोघेही म्हणाले-
अय कंबख्त, कागझ की कश्‍तीसे दरिया फिराता
 क्‍या है,
चिनी बंदूक से हमको यूं डराता क्‍या है?
...माशाल्ला! मार डाला इस शायरीने!!