ढिंग टांग : मराठी तिडीक!

ब्रिटिश नंदी
Friday, 30 October 2020

‘आपण तसे कुणाच्या अध्यात मध्यात नसतो...काय?’ भुवया उडवत तो म्हणाला. आम्ही मान डोलावली.
‘आपण बरे, आपले काम बरे...काय?’ तो. आ. मा. डो.
‘पण म्हणून वाट्टेल ते ऐकून घेणार नाही...काय?’ शेवटला ‘काय’ दरडावणीच्या सुरातला होता. आम्ही काहीच न बोलता नुसतीच मा. डो.!
‘एक घाव दोन तुकडे, असा आपला स्वभाव आहे...काय?,’ त्याने आपली स्वभाववैशिष्ट्ये सांगितली. आम्ही घाबरुन ‘होना, होना’ असे म्हणालो. उगीच दोन तुकडे कशाला करुन घ्या?

‘आपण तसे कुणाच्या अध्यात मध्यात नसतो...काय?’ भुवया उडवत तो म्हणाला. आम्ही मान डोलावली.
‘आपण बरे, आपले काम बरे...काय?’ तो. आ. मा. डो.
‘पण म्हणून वाट्टेल ते ऐकून घेणार नाही...काय?’ शेवटला ‘काय’ दरडावणीच्या सुरातला होता. आम्ही काहीच न बोलता नुसतीच मा. डो.!
‘एक घाव दोन तुकडे, असा आपला स्वभाव आहे...काय?,’ त्याने आपली स्वभाववैशिष्ट्ये सांगितली. आम्ही घाबरुन ‘होना, होना’ असे म्हणालो. उगीच दोन तुकडे कशाला करुन घ्या?
‘भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथा देऊ काठी’ असं समर्थ रामदासांनी म्हणून ठेवलंच आहे...काय?’ तो म्हणाला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘तुकोबामाऊलीनं म्हटलंय...बहुतेक!’ आम्ही चाचरत चुकीची दुरुस्ती केली.
‘हेच तुमचं चुकतं! आमच्या चुका काढा...परवा दसऱ्याच्या भाषणात खुद्द मुख्यमंत्र्यांनी समर्थांचा दाखला दिलाय!’ तो ओरडला. आम्ही बरं म्हणत नुसतीच मा. डो.! मुख्यमंत्र्यांची चूक काढणारे आम्ही कवण?
‘मराठी माणूस असाच आहे...भल्याला नेसूचं सोडून देईल, नाठाळाचं टाळकं सडकेल...काय?’ त्याने आता मराठी माणसाची स्वभाववैशिष्ट्ये सांगायला सुरवात केली. वास्तविक तो मराठी होता, आम्हीही मराठीच आहो! पण जो मराठी मनुष्य दुसऱ्या मराठी मनुष्याला मराठी स्वभावाची वैशिष्ट्ये सांगत राहातो, तो अस्सल मराठी होय! 

‘आपला नाद नाय करायचा! आपल्याशी वाकडं, म्हंजे स्मशानात लाकडं...काय?,’  भेसूर चेहरा करुन त्यानं तांबारलेल्या डोळ्यानं आमच्याकडे बघत वाक्‍य उच्चारले. खरे सांगतो, थरकाप उडाला. कुणी असल्या दिवसात स्मशानबिशान बोलायला लागले की खरोखर कापरे भरते. 
‘मराठीत बोलायची लाज वाटते का...आँ? निमकहराम!!’ दातओठ खात मुठी आवळत तो ओरडला. आम्ही इकडे तिकडे पाहिले. कुणीही नव्हते.
‘छे हो...आम्ही कशाला-’ आमचे वाक्‍य त्याने पूर्ण होऊ दिले नाही. 
‘दात पाडीन!’ तो ओरडला. आमची दातखीळ बसली.

‘भर रस्त्यात थोबडवीन!,’ त्याचा चेहरा हिंस्र झाला होता. आम्ही गपगार झालो.
‘बोलताना तिडिक जाते तुमच्या डोक्‍यात? टाळकं सडकीन!’ त्याने आता एका पायावर लंगडी घालत पायताणच काढायला घेतले. आमची पळता भुई थोडी झाली.

‘अहो, तो मी नव्हेच! तो कुणी सानू का जानू नावाचा उपटसुंभ आहे, त्याच्या डोक्‍यात तिडिक गेली, आमच्या नव्हे! आम्ही अंतर्बाह्य मराठी आहोत हो!’ अजीजीने ओरडत आम्ही पायताण हुकवत पळत होतो, तो आमच्या मागे होता. कुठल्या तरी टीव्हीवरल्या कार्यक्रमात तो कोण जानू का सानू (हे नाव धड लक्षातही राहात नाही! असो!) बडबडला की ‘माझ्या डोक्‍यात जाते, तो किस्सा आम्ही त्यास नीट एक्‍सप्लेन करुन डिटेलमध्ये सांगितला. 

‘आधी का नाही सांगितलं?’  दम खात तो ओरडला. आम्ही मराठीतच गप्प राहिलो. ‘असल्या लोकांना सरळ करणं हा आमचा धर्म आहे म्हणावं! जा, सांगा त्यांना!,’ त्याने आम्हाला बजावून सांगितले.
‘सरळ म्हंजे नेमकं काय करायचं?‘ आम्ही विचारले.
‘मागायला लावायची! माफी मागितली की बात खतम! कळलं?’ त्याने तोडगा सांगितला. आम्हाला हे आवडले!!

...कुणीही यावे, मराठीचा अपमान करोनी जावे! तदनंतर सुरक्षित अंतरावरुन माफी मागावी, सगळे खुश! मराठी माणूस असल्या माफीवर दिलखुश होतो, आणि झाले गेले विसरुन मराठीच्या नव्या अपमानासाठी सिद्ध होतो. चलता है! (हे हिंदीतच!!) शेवटी मराठी माणूस असाच. कुणाच्या अध्यात ना मध्यात...काय?

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial article on dhing tang