ढिंग टांग : ‘जो’ जे वांछील..!

ब्रिटिश नंदी
Friday, 6 November 2020

हे देअर...हौडी! होप यु फाइण्ड माय मेल इन गुड हेल्थ अँड स्पिरिट!! नुकत्याच आमच्या निवडणुका पार पडल्या. लौकरच निकाल लागेल, आणि आपण ठरल्याप्रमाणे पुन्हा भेटू. (तुमचा फाफडा टेस्ट करण्याचे मागल्या वेळेला राहूनच गेले आहे...) सगळं ठरल्याप्रमाणेच होणार आहे; पण आपल्या मित्रासाठी (दॅट्‌स मी, ब्रो!) एक गोष्ट करणार का? हे विचारण्यासाठीच अर्जंट पत्र लिहित आहे. तशी माझी निवड अगदी औपचारिक अशीच उरली आहे.

हे देअर...हौडी! होप यु फाइण्ड माय मेल इन गुड हेल्थ अँड स्पिरिट!! नुकत्याच आमच्या निवडणुका पार पडल्या. लौकरच निकाल लागेल, आणि आपण ठरल्याप्रमाणे पुन्हा भेटू. (तुमचा फाफडा टेस्ट करण्याचे मागल्या वेळेला राहूनच गेले आहे...) सगळं ठरल्याप्रमाणेच होणार आहे; पण आपल्या मित्रासाठी (दॅट्‌स मी, ब्रो!) एक गोष्ट करणार का? हे विचारण्यासाठीच अर्जंट पत्र लिहित आहे. तशी माझी निवड अगदी औपचारिक अशीच उरली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

थोडी मतमोजणी बाकी आहे; पण मला त्याची पर्वा नाही. मीच जिंकणार, याच्यात काहीच संदेह नाही. कारण मी कधी हारलेलोच नाही! पण सरप्राइजिंगली यंदाचे इलेक्‍शन खूप टफ झाले, असे काही लोक म्हणत आहेत. मला तसे वाटत नाही. पण माझे विरोधी मि. जो बायडन (कॉल हिम जो!) यांनी उगीचच आकांडतांडव करत स्वत:ला ऑलमोस्ट विनर ठरवून टाकले आहे. धिस इज नॉट डन! मी कोर्टात जाणार आहे!!
मी असताना कोणी दुसरा कसा काय व्हाइट हाऊसमध्ये राहू शकेल? इंपॉसिबल!! जो बायडनसारखी माणसे तिथे घुसली तर चायनाचे किती फावेल, याची लोकांना कल्पना नाही. इट इज व्हेरी सॅड, यु नो!!

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मतमोजणी हा एक लोकशाहीतला बोअरिंग प्रकार आहे, असे माझे मत झाले आहे. वास्तविक इलेक्‍शननंतर मतमोजणी तरी का करतात, हेच मला कळत नाही. नुसतेच इलेक्‍शन घ्यावे, आणि विनरचे नाव (अगेन दॅट्‌स मी...ब्रो!) डिक्‍लेर करावे, हेच योग्य नाही का? शिवाय मी उभा असताना मतमोजणी हवी कशाला? काहीत्तरीच यांचं!! मतमोजणी करणे हाच लोकशाहीतला सर्वात मोठा फ्रॉड आहे, असे माझे मत आहे. वेल बघू या काय होतेते...
मी पुन्हा व्हाइट हौसमध्ये येणार, असे मी ऑलरेडी जाहीर केले होते. पण तेच चुकले! ‘म ी पुन्हा येईन’ असे मी म्हणायला नको होते, असे आता माझे कार्यकर्ते सांगू लागले आहेत. ‘व्हॉट्‌स राँग विथ मी पुन्हा येईन?’ असे मी आमच्या प्रचारप्रमुखाला विचारलेही. पण तो म्हणाला, की तुमच्या इंडियातल्या मित्रांना विचारा! जाऊ दे.

इलेक्‍शनचा रिझल्ट कुठल्याही क्षणी लागेल. तो आपल्याच बाजूने लागेल यात शंका नाही. परंतु, आमचे कार्यकर्ते धास्तावले आहेत. त्यांच्या समाधानासाठी तुमच्या मि. मोटाभाईंची ऑनलाइन गाठ तरी घालून द्या. त्यांच्याकडे नक्की काहीतरी तोडगा असेल. 
कळावे. 
टेक केअर.
तुमचा जानी दोस्त. डोलांड (तात्या)
.....
डिअर डोलांडभाई, सतप्रतिसत प्रणाम. श्रीमान मोटाभाई सध्या बंगालमध्ये गेले आहेत. तिथल्या इलेक्‍सनचा बंदोबस्त होईपर्यंत अवेलेबल होणार नाहीत. व्हेरी व्हेरी सोरी!! बाकी तुमच्या इलेक्‍सनवर आमच्या ध्यान होता. त्याचा काय हाय के, इलेक्‍सनमां हारजीत तो च्याले छे! डोण्ट वरी!! जिंकला नाय तरी पण मी फाफडा मुकीश!! ओक्के? आत्ताज जोभाई बायडेनला कोंग्रेच्युलेशनचा मेसेज पाठवला. आवते जान्युअरीमां एने अहमदावाद बुलावीना प्लॅन छे!! त्यांना पण आमचा ढोकळा, फाफडा अने खांडवी बहु गमे छे!! सो, बाय बाय डोलांडभाई. आव जो! 
तमारा (जूना) मित्र. नमो.
ता. क. : ‘पुन्हा येईन’ असा इलेक्‍सनआधीच सांगितला तर पब्लिक वैतागते असा आमचा एक्‍सपीरिअन्स आहे. ‘पुन्हा येईन’  एऊ केहवाय, तो माणस बेरोजगार थये छे!!
सांभळ्यो? पछी आवजो! नमो.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial article on dhing tang 6th November Friday