
ढिंग टांग
दिवस : गेला रविवार. वेळ : गेलेली. प्रसंग : गुदरलेला.
तो : (छातीत धडधड) अगं ए, इकडे बघ!
ती : (केस बांधत) तेवढाच उद्योग आहे का? कामं आहेत मला!
तो : (निक्षून) हलू नकोस! स्टॅच्यू!!
ती : (वैतागून) लिंबूपाणी आणून देऊ का? काल रात्री उशीरा आला होता...
तो : (टक लावून बघत) एक क्षणही मी नजर ढळू देणार नाही!