प्रिय मित्रवर्य नानासाहेब, शतप्रतिशत प्रणाम. आज तुमचासुद्धा वाढदिवस आहे, हे गेले दीड वर्ष घोकत होतो. ऐनवेळी घोटाळा नको, म्हणून काल रात्रीच रिमाइंडर लावून ठेवला. वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. आमच्या बारामतीत (आणि पुण्यात) होर्डिंग लावायला सांगितले होते.