ढिंग टांग : येस, मि. प्रेसिडेंट..!

ओव्हल हपिस, व्हाइट हौस, वॉशिंग्टन. पात्रे : पोटस ऊर्फ डोलांडतात्या आणि त्यांना ‘पोटस’ असे छोटसं कोडनेम ठेवणाऱ्या सीआयएचे प्रमुख मि. जॉन रॅटक्लिफ.
Dhing Tang

Dhing Tang

sakal

Updated on

स्थळ : ओव्हल हपिस, व्हाइट हौस, वॉशिंग्टन. पात्रे : पोटस ऊर्फ डोलांडतात्या आणि त्यांना ‘पोटस’ असे छोटसं कोडनेम ठेवणाऱ्या सीआयएचे प्रमुख मि. जॉन रॅटक्लिफ.

पोटस : (डोळे मिटून) किती वाजले, मि. रॅटक्लिफ?

रॅटक्लिफ : (डोळे मिटूनच) सिक्स ओ झिरो झिरो!

पोटस : (डोळे किलकिले) सहा हजार वाजले?

रॅटक्लिफ : (सुस्कारा सोडत) हो!

पोटस : दॅट्स वंडरफुल! नाइस, ब्युटिफुल!! माझं नऊ वाजता भाषण होतं! ते झालं का?

रॅटक्लिफ : (रिपोर्टिंग करत) येस, मि. प्रेसिडेण्ट, तुम्ही ठरल्याप्रमाणे सायंकाळी नऊ वाजता जगाला उद्देशून भाषण केलंत! सांगायला आनंद वाटतो की त्याचा योग्य तो परिणाम झालाय!!

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com