
हौस ऑफ बांबू
न अस्कार! आधीच (सर्व संबंधितांना) सांगून टाकत्ये की, माझा स्वत:चा कुंडलीशास्त्रावर अजिबात विश्वास नाही. अगदी कुंडलीवर नाही, नि हस्तसामुद्रिकावरही नाही. ज्योतिषी काहीही सांगोत! ‘यंदा योग आहे’ हे वाक्य ऐकत ऐकत मी दिवस काढत्ये आहे. कुंडल्यासुध्दा बदलून पाहिल्या. (खुलासा : पुण्यात काही ठिकाणी मॅचेबल कुंडल्या बनवून मिळतात. पत्ता सांगणार नाही!) पण अजूनही मी नावापुढे ‘कु.’च लावते. कदाचित माझ्या ओरिजिनल कुंडलीत असाच योग असेल. असो.