ढिंग टांग - कोई न बोले ऊठ…!

स्थळ : मातोश्री हाइट्स, वांद्रे सोसायटी. वेळ : निजानीज
Political Satire

Political Satire

esakal

Updated on

स्थळ : मातोश्री हाइट्स, वांद्रे सोसायटी. वेळ : निजानीज.

चि. विक्रमादित्य : (खोलीचे दार ठोठावत) हाय देअर बॅब्स...मे आय कम इन?

उधोजीसाहेब : पांघरूण अंगावर ओढून घेत) नोप...गुडनाइट! दूध पिऊन झोप बरं!!

विक्रमादित्य : (खोलीत धाडकन शिरत) एका इंपॉर्टंट टॉपिकवर डिस्कशन करायचं होतं...!

उधोजीसाहेब : (कटकटून) मी असलं काही करत नाही रे! डिस्कशन कसलं? मी थेट आदेश देतो...

विक्रमादित्य : (गांभीर्यानं) सॉरी! लोकशाहीत डिस्कस करावंच लागतं!! कांट हेल्प!!

उधोजीसाहेब : (उडवून लावत) ते सगळं तुम्ही करा, आणि आदेश मागायला माझ्याकडे या!!

विक्रमादित्य : (हट्ट न सोडता) आपल्या राज्यसभेच्या एकमेव जागेचं काय करायचं आहे? आघाडी पीपल आर डिमांडिंग दॅट प्लेस!! मी म्हटलं, नथिंग डुइंग, ती जागा आमची आहे, आणि आमचीच राहणार!!

उधोजीसाहेब : (समंजस सुरात) ऐसी बात बोलिये, कोई न बोले झूटा, ऐसी जगह बैठिये, कोई न बोले आता उठा...!

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com