
आजची तिथी : विश्वावसु संवत्सर श्रीशके १९४७ वैशाख कृ. दशमी.आजचा वार : ॐ बुधाय नम:
आजचा सुविचार : पर्बतों से आज मैं टकरा गया, तुमने दी आवाज, लो मैं आ गया..!………..
नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) गेले दोन दिवस पर्बतों से आज मैं टकरा गयाऽऽ..हेच गाणे (सुप्रसिध्द गायक शब्बीरकुमार ऊर्फ गरीबांचे रफीसाहेब) गुणगुणतो आहे. आमचे परममित्र छगनबाप्पा भुजबळसाहेब हे शपथविधीला राजभवनात आले, तेव्हापासून हेच गाणे आठवते आहे. खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आमचे छगनबाप्पा परत आले. मी पुन्हा येणार नाही, असे म्हणत म्हणत आले!!