टळटळीत दुपार होती. प्रचंड गदमदत होते. ‘शिवतीर्थ’गडावर छताचा पंखा फुल्ल स्पीडने फिरत होता. पंख्याखाली ‘स्सस्सस्स’ ऐसा ध्वनी ऐको आला. खुद्द राजेसाहेब वाऱ्याखाली विसावा घेत होते. थोड्या वेळाने त्यांनी फर्जंदास हांक मारोन शीतकपाटातील थंड पाणी मागवले.
‘छे, भलतंच उकडतंय..,’ राजेसाहेब वैतागून म्हणाले.
‘हो ना, काय हा उकाडा म्हणायचा का काय,’ फर्जंद निष्ठेला जागून व्यक्त झाला. नकळत त्याचाही हात स्वत:च्याच सदऱ्याच्या बटणाशी गेला. पण लागलीच भानावर येऊन त्याने स्वत:स सावरले. नुकतेच जेवण झाले होते.