
सर्व सहकाऱ्यांसाठी अत्यंत अर्जंट आणि तातडीचे-
महायुतीला प्रचंड जनादेश मिळाल्याच्या शॉकमधून अजून अनेक जण बाहेर पडलेले नाहीत. खुद्द माननीय मुख्यमंत्री खिशात कांदा ठेवूनच दावोसचा दौरा करुन आले. दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री एकमेकांना वारंवार चिमटे काढून बघत आहेत. तथापि, या महायशामुळे काही मंत्र्यांना मात्र कानात वारे शिरल्यागत अनुभव आला.