ढिंग टांग : श्रमपरिहार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

election-bihar

बिहारमध्ये असा होतास किती दिवस? ऐन प्रचाराच्या धामधुमीत प्रियंकादिदीच्या हिमाचलमधल्या फार्म हाऊसवर गेला होतास राहायला! समजतात सगळ्या बातम्या मला इथे बसून!

ढिंग टांग : श्रमपरिहार!

बेटा : (नेहमीच्या उत्साहात एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽण! मम्मा, आयॅम बॅक!

मम्मामॅडम : (कोरडेपणाने) हं!

बेटा : (आरशात बघून भांग पाडत) चलो, हम आतें हैं! मी निघालो!! बाय बाय!! (गाणं गुणगुणत) केसरियाऽऽ... पधारो म्हारो देस...!

म्मामॅडम : (आश्‍चर्यानं) आता कुठे निघालास? आणि ‘केसरिया’ काय? नावसुद्धा घेऊ नकोस त्या रंगाचं!!

बेटा : (आरशात स्वत:ला न्याहाळत) मी राजस्थानला चाललोय... जैसलमेर!! बिहारमधल्या इलेक्‍शनमध्ये मी इतकं काम केलं, इतकं काम केलं की विचारु नकोस!!

श्रमपरिहारासाठी कुठे तरी जायला हवं!

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मम्मामॅडम : (नापसंतीने) उगीच काहीतरी कारणं सांगू नकोस! बिहारमध्ये असा होतास किती दिवस? ऐन प्रचाराच्या धामधुमीत प्रियंकादिदीच्या हिमाचलमधल्या फार्म हाऊसवर गेला होतास राहायला! समजतात सगळ्या बातम्या मला इथे बसून!

बेटा : (खांदे उडवत) कमॉन! दिदीनं आग्रह केला म्हणून वेळात वेळ काढून तिथं गेलो होतो! पण आता इलेक्‍शन झाल्यावर श्रमपरिहाराला जायला नको? ही कोरोनाची कटकट आहे म्हणून... नाहीतर महिना-दोन महिने जाऊन आलो असतो- विपश्‍यनेला!! (निरागसपणे) तू सुट्टी दिली असतीस ना? मी खूप दिवसात विपश्‍यनेला गेलो नाहीए! प्लीज नोट!!

मम्मामॅडम : (कपाळाला हात लावत) पोटनिवडणुकांमध्येही आपल्या पक्षाची वाट लागली आहे! कार्यकर्ते किती खचून गेले आहेत! लागोपाठ पराभव किती स्वीकारायचे? तू कधी लक्ष घालणार आहेस या सगळ्यात? मला झेपत नाही रे आता!!

बेटा : (दिलासा देत) जस्ट टू डेज मम्मा! दोन दिवसात जाऊन परत येतो! मग मी आहेच!! यु कॅन काऊण्ट ऑन मी!! मला राजस्थानात जाऊ दे! उंटावर बसू दे! दालबाटी चूरमा खाऊ दे! मग आपल्या पक्षाला म्हणावं, तू मला खा! हाहा!!

मम्मामॅडम :  ओह गॉड! सेव्ह मी!!

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बेटा : (स्वप्नाळू डोळ्यांनी...) वाळवंटात जाऊन मी रात्रीचे तारे बघणार आहे!!

मम्मामॅडम : (खुर्चीत मटकन बसत) इथे आम्हाला दिवसा तारे दिसायला लागले आहेत!

बेटा : (साफ दुर्लक्ष करत) बिहारमध्ये मला लालटेनवाला नवा मित्र मिळालाय! त्याचं आणि माझं ठरलं होतं की इलेक्‍शननंतर कुठे तरी भटकायला जाऊ या! पण आता त्यांचा मूड गेलाय म्हणे!

मम्मामॅडम : (हताशपणे) जाणारच! तुझा मूड जात नाही, याचंच आश्‍चर्य वाटतंय मला! बिहारमध्ये काय झालंय ते तरी बघ जरा!

बेटा : (खांदे उडवत) सो व्हॉट! गेले सहा-सात वर्ष जे चालू आहे, तेच घडलंय की! शिवाय त्यात माझी काहीच चूक नाही! त्या लालटेनवाल्यांनी सगळा घोळ केला!

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मम्मामॅडम : (दु:खातिरेकानं) तुझ्यामुळे गठबंधन हरलं, असं म्हणताहेत लोक!

बेटा : (आश्‍चर्याचा धक्का बसून) माझ्यामुळे? कमॉन!! आता मात्र हद्द झाली! मी काय केलं?

मम्मामॅडम : (खोल आवाजात) काहीच केलं नाहीस, असंच म्हणताहेत लोक! अशाने कुणी आपल्याला कुठल्याही गठबंधनात घेणार नाहीत, हे लक्षात ठेव!!

बेटा : (बेफिकिरीने) न घेवोत! आयॅम इन डिमांड!! राजस्थानचा दौरा आटोपला की दोन दिवस महाराष्ट्रात येऊन जा, असं निमंत्रणसुद्धा आलंय मला! जाऊ का?
मम्मामॅडम : काहीतरीच! कुणी पाठवलंय निमंत्रण?
बेटा : (बुचकळ्यात पडत) कुणास ठाऊक! नावच नाहीए निमंत्रणाखाली!! कोण असेल?

loading image
go to top