आमच्या लाखो वाचकांना दीप अमावस्येच्या अनेक उत्तम शुभेच्छा! दीप अमावस्या हे एक पवित्र पर्व असते. या दिवशी दिवे लावण्याची पूर्वापार परंपरा आहे. आधुनिक काळात काही सामाजिक बदल झाले, त्यात हे दिवे लावण्याचे प्रकार सायंकाळी आधिक्याने होऊ लागले.
दिव्यांच्या अवसेला तमोगुणांचा त्याग करुन सत्त्वशील जीवनशैलीचा अंगीकार करण्यासाठी नश्वर देह कामी आणावा, अशी योजना असते. तमोगुणांचा विनाश ही तशी सहजसाध्य गोष्ट नव्हे. त्यासाठी बरेच प्रयास पडतात. प्रसंगी देह कारणी पडावा लागतो.