Dhing Tangsakal
satirical-news
ढिंग टांग : सरकारी काम, सहा सेकंद थांब...!
सरकारी कामांसाठी जनतेचा प्रचंड खोळंबा होतो. जावे, तेथे ‘उद्या या’ असे उत्तर मिळत असल्याने नागरिक सरकारी कचेऱ्यांमध्ये महिनोन् महिने खेटे घालत असतात.
सर्व संबंधितांस सूचना - जनतेची कामे गतिमान पद्धतीने व्हावीत, म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांकडून सात कलमी कार्यक्रम राबवण्यात येत असून येत्या शंभर दिवसात ही सातही कलमे अंमलात आली पाहिजेत, असा सक्त आदेश आहे. सरकारी कामांसाठी जनतेचा प्रचंड खोळंबा होतो. जावे, तेथे ‘उद्या या’ असे उत्तर मिळत असल्याने नागरिक सरकारी कचेऱ्यांमध्ये महिनोन् महिने खेटे घालत असतात. त्यामुळे माननीय मुख्यमंत्री भयंकर रागावले आहेत.