

नाही म्हटले तरी भलती दगदग झाली. मराठवाडा, विदर्भ दौरे लागोपाठ झाले. एकाच महिन्यात येवढी दौड बरी नव्हे. वृथा भागदौड करुन काय उपयोग? घोडामैदान दूर नाही. हा हा म्हणताना निवडणुकीचे रणशिंग वाजेल. मग एकच भाऊगर्दी उडेल. जो तो दौरे काढेल. आपला दौरा सर्वात आधी उरकून घेतला, हे बरेच झाले…