आजची सकाळ नवीनच होती. ‘फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश, दरीखोऱ्यातून वाहे, एक प्रकाश प्रकाश…’ हे मधुर गीत गुणगुणण्याचे मला सुचले. कसे सुचले? माझे मलाच आश्चर्य वाटले. उठून बाहेरच्या खोलीत आलो. वर्तमानपत्रे ठेवली होती. ती ताजी होती, हे बघून मला आश्चर्यच वाटले.