ढिंग टांग : हम निकले थे जापान..!

Satirical Take on Narendra Modi, Japan Visit and Japanese Language : जपानी भाषा शिकल्याचा दावा, मोदीभक्तीचा विनोदी अतिरेक आणि आंतरराष्ट्रीय राजकारणातील गंमतीदार प्रसंग यांतून राजकीय दिखावेगिरीवर उपरोधिक भाष्य करत लेखाने वाचकांना खळखळून हसवले आहे.
Satirical Take on Narendra Modi, Japan Visit and Japanese Language :

Satirical Take on Narendra Modi, Japan Visit and Japanese Language :

esakal

Updated on: 

आजची तिथी : श्री पराभव नाम संवत्सर श्रीशके १९४८ कार्तिक कृ. द्वितीया.

आजचा वार : नमोवार...आय मीन गुरुवार!

आजचा सुविचार : मेरा जूता है जापानी, ये पतलून इंग्लिस्तानी, सर पे लाल टोपी रुसी, फिर भी दिल है हिंदुस्थानी!

नमो नमः नमो नमः नमो नमः नमो नमः (१०८ वेळा लिहिणे) जगात काहीही उलटेपालटे होवो, मी डायरी लिहिणे काही सोडत नाही, सोडणारही नाही. नमोमंत्राचा लक्ष वाहण्याचा संकल्पही नित्य चालू ठेवणार आहे. नमो नमः हा सिद्ध मंत्र जपानी भाषेतही कसा म्हणतात, ते मी नुकतेच शिकून घेतले आहे. जपानी भाषेत नमो नमः हे कसे लिहावे? तर ‘नारेंदोरा मोदी नामो नामाहा’ असे संपूर्ण लिहावे लागते. मी लिहीन!!

Loading content, please wait...