
Diwali special
Sakal
न अस्कार! सर्वप्रथम माझ्या लाखो लाखो चाहत्यांना (-आणि काही थोड्या वाचकांना) दीपावलीच्या शुभेच्छा! ही दिवाळी तुम्हा सर्वांना अतिशय आनंदाची जावो!! काही दिवस गडबडीत होत्ये, वर्षभर बारा-बारा कवितांचे गुच्छ करुन ठेवले होते, थोडी फेरफार करुन, ते दिवाळी अंकांच्या कार्यालयात नेऊन दिले. एक कविता दिली तर पानपूरक म्हणून वापरतात मेले!! दोन दिल्या तर साभार परत करतात आणि बारा-बारा दिल्या, तर ललित लेख म्हणून तरी छापतात!! काही का असेना, पण रसिकांपर्यंत माझी कविता पोचते. म्हणून सर्व कविमित्रांना आणि मैत्रिणींना माझा सल्ला आहे की, बारा-बारा कविताच पाठवा…माझ्या एका कवयित्री असलेल्या हळव्या मैत्रिणीनं माझा सल्ला ऐकून बारा कवितांचा वाटा एका दिवाळी अंकाला पाठवला, तो मुलाखत म्हणून छापून आला. आता बोला!