
Diwali Turnover of the Indian Economy
Sakal
वस्तू-सेवा करातील कपात आणि पुनर्रचनेनंतर भारतीय ग्राहकांना कधी एकदा खरेदीसाठी बाहेर पडतो, असे झाले होते. ऐन दिवाळीत सात लाख कोटींची उलाढाल झाल्याची खबर आहे. सात लाख कोटी म्हणजे सातावर किती शून्ये, हे आम्ही सध्या तरी शब्दसंख्येच्या मर्यादेमुळे सांगू शकणार नाही. तरीही बरीच असावीत, असे मानायला हरकत नाही. एकंदरीत बावीस लाख कोटींची खरेदी यंदा होईल, असा अंदाज आहे.
देशातच उत्पादावे, आणि देशातच संपवावे, असा हा अर्थफराळ आहे. उत्पादन हा शब्द आम्हाला तितकासा आवडत नाही. त्याला उगाचच निराळा वास येतो. म्हणून आम्ही चीजवस्तू येवढेच म्हणू. तथापि, स्वदेशीचे व्रत भारतीय ग्राहकराजाने अंगीकारले याचा अभिमान आम्हाला वाटतो.