

Introduction to the Double Marathon Interview
Sakal
एकाच माणसाची एकाच माणसाने मुलाखत घेतल्यास त्यास सिंगल मुलाखत असे प्राय: म्हटले जाते. (ही व्याख्या आम्ही आत्ताच केली!) डब्बल माणसांनी सिंगल माणसाची मुलाखत घेतली तरी त्याला सिंगलच मुलाखत म्हणतात. (ही व्याख्याही आत्ताचीच.) पण दोघांनी दोघांना एकाच वेळी सवाल करण्याच्या प्रयत्नाला डब्बल मुलाखत असे म्हणतात. (पुन्हा तेच!) ‘टू इज कंपनी थ्री इज क्राऊड’ अशी इंग्रजीतली म्हण बॉम्बे स्कॉटिश शाळेत (माहीम, माहीम!) शिकवतात. दोघांचा तो सहवास, तिघांची ती गर्दी असा त्याचा बालमोहन शाळेतला (दादर, दादर!)अर्थ सांगता येईल. पण ते एक असो.