दारु पिणे ही अत्यंत वाईट सवय आहे. त्यामुळे संसाराची धूळधाण होते. करिअर बरबाद होते आणि दारिद्र्य येते. समाजात माणसाची ओळख राहात नाही, की पत राहात नाही. मनुष्य कितीही कितीही बुद्धिमान, प्रतिभावान आणि गुणवान असो, मद्याच्या आहारी गेला की त्याचे माकड होते.